vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

उद्योजकता विकास केंद्राव्दारे शेळी, कुक्कुट पालन प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन

उद्योजकता विकास केंद्राव्दारे शेळी, कुक्कुट पालन प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन..

 

              बुलडाणा, प्रतिनिधी: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र बुलढाणामार्फत शेळी, कुक्कट, गाय व म्हैस पालन प्रशिक्षणाचे आयोजन दि. 21 ते 25 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. उद्योग, व्यवसाय करू इच्छिणारा सुशिक्षित बेरोजागार युवक-युवतीनी दि. 21 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.

  प्रशिक्षणामध्ये शेळी, कुकुट, गाय व म्हैस पालनाचे तंत्र, प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग, लक्षणे, खाद्य निर्मिती, चाऱ्यांचे प्रकार, शासकीय योजना व उद्योग सुरु करण्यासंदर्भातील माहिती पाच दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षित बेरोजगारांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन स्व:ताचा व्यवसाय सुरु करावा हा आहे.

    प्रशिक्षणात प्रवेश घेणारा उमेदवार हा किमान पाचवी पास, वयोगट 18 ते 50 वर्षे असावा. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाईल. प्रशिक्षणाची नोंदणी दि. 21 जानेवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत सुरु आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तहसिल कार्यालयजवळ, चिखली रोड, बुलडाणा येथे किंवा मो. नं. 9011578854, 8275093201 वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्यदिनानिमित्त मेळघाट हाट येथे खादी महोत्सव

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे कालमर्यादा आखून पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका यंत्रणांचा योजनानिहाय आढावा…

vishwatmaklokswamivarta

धरती आबा’ आणि ‘पीएम जनमन’ योजना लोकचळवळ बनवण्याचे मंत्री डॉ. अशोक उईके यांचे आवाहन* १५ ऑगस्टपूर्वी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश*

24 मार्चला जालना येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन• नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन

महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा पश्चिम बंगालचे उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्द राज्यपालांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला कौतुकाची थाप

अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पास 15 ऑगस्टपासून सुरू