vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नगर विकास विभागाच्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आज 

नगर विकास विभागाच्या विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आज

 

              छत्रपती संसंभाजीनगर प्रतिनिधी नगर विकास विभाग आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालय व विभागीय आयुक्त कार्यालय नगरपरिषद प्रशासन शाखा यांच्या वतीने विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम रविवार दि.१९ रोजी होत आहेत.

   क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते रविवार दि.१९ रोजी सकाळी १०वाजता तर सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता विभागीय क्रीडा संकुल गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

 क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्यास विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत तर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे व अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे यांची उपस्थिती राहणार आहे.

     या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विभागातील ८ जिल्ह्यांचे संघ आणि ७०० खेळाडू सहभागी होणार आहेत. क्रीडा स्पर्धांत क्रिकेट, कबड्डी, रस्सीखेच, व्हॉलीबॉल या सांघिक खेळांचा तसेच बुद्धिबळ, कॅरम, १०० मी., २०० मी., ४०० मी. धावणे, थाळी फेक, भाला फेक, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी या वैयक्तिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे, उपस्थितीचे आवाहन सह आयुक्त नगरपालिका प्रशासन सय्यद रफिक यांनी केले आहे.  ०००००

संबंधित पोस्ट

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची हॉल तिकीटासाठी अडवणूक न करण्याचे शाळा व्यवस्थापनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारताचा 76 वा प्रजासत्ताक आज दिन रविवार, दि. 26 जानेवारी 2025 रोजी साजरा होत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी नमुंमपा मुख्यालयातील ध्वजारोहणप्रसंगी सकाळी 8 वा. उपस्थित राहण्याचे नागरिकांना आवाहन 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी* 

कारागृहातील बंद्यांच्या मनपरिवर्तनासाठी मुलाखत कक्ष उपयुक्त- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- बंदी नातेवाईक भेटीसाठी मुलाखत कक्षाचे उद्घाटन – कौशल्य प्रशिक्षित बंद्यांना प्रमाणपत्र वितरण

सांस्कृतिक कार्य विभागाचा उपक्रम; शहाजीराजे भोसले जयंतीनिमित्त‘स्वराज्य संकल्प महोत्सवाचे सोमवारी (दि.२७) भव्य आयोजनलोककलावंतांच्या सादरीकरणातून स्वराज्य संकल्पाचा प्रेरणादायी इतिहास उलगडणार…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत सदनिका आणि भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत संपन्न,सर्वसामान्यांना परवडणारी, दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटीबद्ध-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta