vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे अध्यात्म, वैदिक तत्वज्ञानातील तेजोमय दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ज्येष्ठ निरूपणकार ह.भ.प. डॉ. किसन महाराज साखरे यांना श्रद्धांजली..

गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे अध्यात्म, वैदिक तत्वज्ञानातील तेजोमय दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ज्येष्ठ निरूपणकार ह.भ.प. डॉ. किसन महाराज साखरे यांना श्रद्धांजली..

 

राज्य प्रतिनिधी-

अध्यात्म, वैदिक ज्ञान परंपरेचा निस्सीम साधक म्हणून गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांची कार्यसाधना पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी तेजोमय राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ निरूपणकार, संत साहित्य आणि अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचे श्रेष्ठ अभ्यासक गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘गुरूवर्य डॉ. किसन महाराज यांनी साधकाश्रमाच्या माध्यमातून सुरू केलेले कार्य महत्त्वपूर्ण असे आहे. वेदांत तत्त्वज्ञान आणि संत विचारांची त्यांनी सांगड घालून त्याच्या प्रचार-प्रसारासाठी जीवन समर्पित केले. महाराष्ट्रातील संताची साहित्य संपदा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी कीर्तन- निरुपणातून अविरत प्रयत्न केले. यासाठी आधुनिक ज्ञान- शिक्षण साधनांचा त्यांनी प्रभावी वापर केला. याच ध्यासातून त्यांच्याकडून अनेकविध मौलिक ग्रंथ निर्मिती झाली. या सगळ्या गोष्टी भावी कित्येक पिढ्यांसाठी तेजोमय दीपस्तंभ म्हणून ज्ञानप्रकाश देत राहतील. महाराष्ट्र एका अलौकिक ज्ञानसाधकास, तत्वचिंतकास मुकला आहे. त्यांचा साधक परिवार, तसेच कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ब्रम्हलीन गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम  

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील 100 विहिरी स्वच्छ करून त्यातील पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय..

आताची मोठी बातमी – मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव राज्यभर जाणवतोय 🌧️सोलापूर, पुणे, चंद्रपूर, नागपूर, वाशीम आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस. 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राजभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा राजस्थान व ओडिशाचे राज्याच्या विकासात देखील मोठे योगदान..’पधारो म्हारो देस : राज्यपालांकडून रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील  विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप

राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार,पुढील काही तास धोक्याचे 5 दिवस राज्यासाठी IMDने तीव्र हवामान अलर्ट जारी केले…

कुंभमेळ्याचे पावित्र्य टिकवून विकासासोबत वारशाचेही जतन करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,· नाशिक महापालिकेचा ‘क्लीन गोदावरी बॉण्ड’ नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध गोदावरी स्वच्छतेसाठी नागरिक आणि गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त सहभाग गरजेचा

vishwatmaklokswamivarta