vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण

राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण

मुंबई, प्रतिनिधी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरित करण्यात आला. राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

मुंबई येथून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹६,००० इतकी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. महाराष्ट्रातील ९० लाखांहून अधिक पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात २३ व्या हप्त्याचा लाभ थेट जमा करण्यात आला असून यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता वेळेवर वितरित केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांतर्फे आभार व्यक्त करतो.”

महाराष्ट्रातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत २२ हप्त्यांद्वारे सुमारे ₹४१,०८३ कोटींचा लाभ वितरित करण्यात आला आहे. यंदाच्या २३ व्या हप्त्यात राज्यातील भूमी अभिलेख अद्ययावत, आधार संलग्न बँक खाते व ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे ₹१,८१७ कोटींचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे मिळणार आहे.पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा व तालुका कृषी कार्यालये, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघटना तसेच सहकारी संस्थांमध्ये आयोजित करण्यात आले.

केंद्र शासनाने २० जून हा दिवस देशभर ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कृषी विभाग, महसूल व वन विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

पीएम किसान योजेनेचे सर्वाधिक लाभार्थी असलेले जिल्हेअहिल्यानगर (लाभार्थी 5,45,481 व एकूण रक्कम 109.32)सोलापूर (लाभार्थी 4,94,447 व एकूण रक्कम 98.89)कोल्हापूर (लाभार्थी 4,60,687 व एकूण रक्कम 92.19)सातारा (लाभार्थी 4,36,055 व एकूण रक्कम 87.22)पुणे ( लाभार्थी 4,30,519 व एकूण रक्कम 86.10)नाशिक (लाभार्थी 4,26,540 व एकूण रक्कम 85.34)

0000

संबंधित पोस्ट

विशेष लेख : – दिपावली विशेष-ज्ञानाचे दीप प्रज्वलित करूया.. अज्ञानाचा अंधार दूर करूया..!

vishwatmaklokswamivarta

मिरवणुक मार्गावरील खड्डे बुजवा – शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर विभागात एक विद्यार्थी- एक वृक्ष उपक्रमपर्यावरण समृद्ध करण्यासाठी नियोजन, सहभाग नोंदविण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ• जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन

महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर…

जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा-नियोजनबध्द व शिस्तीत पार पाडावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ· जालना जिल्‍ह्यातील 30 केंद्रावर एकुण 9 हजार 760 विद्यार्थी देणार परिक्षा· परीक्षेदरम्‍यान अनुचित प्रकार करणाऱ्या विरुध्द गुन्‍हा दाखल होणार

vishwatmaklokswamivarta