vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रायगड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना आधार प्रमाणीकरण ई-केवायसी अनिवार्य*

*रायगड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना आधार प्रमाणीकरण ई-केवायसी अनिवार्य*

रायगड प्रतिनिधी- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसी (e-kye) करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.

 लाभार्थ्यांचे ई-केवायसी (e-kyc) करण्यार्कारता गावोगावी कॅम्प आयोजीत केले आहे. या करिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभाथ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी (e-kyc) करावयाचे आहे. सदरील प्रक्रिया दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत करावयाची असल्याने लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये अथवा कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठयाचा ठसा व आधार नंबर देऊन ई-केवायसो (e-kyc) करावी. ई-केवायसी (c-kyc) केले नाही, तर दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ नंतर धान्य दिले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी कॅम्प चा लाभ घ्यावा.या संदर्भात सर्व लाभार्थी व रास्तभाव धान्य दुकानदार यांना दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ पूर्वी १००% कामकाज पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.

तसेच जिल्हयातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांना सुचित करण्यात येते की, त्यांनी प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेस अन्नदिन साजरा करुन लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरु करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये दर महिन्याच्या १५ तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण करावे. अशा सक्त सूचना देण्यांत येत आहेत.

तसेच वन नेशन वन रेशनकार्ड अंतर्गत (Portability) राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानामध्ये जाऊन अन्नधान्याची उचल करीत आहेत. त्या लाभार्थ्यांनी त्याच दुकानामध्ये ई-केवायसी (e-kyc) करुन घ्यावी. अन्यथा आपल्या गावी रास्तभाव धान्य दुकानात जाऊन केवायसी (e-kyc) करावी.

*केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत/असघंटीत कामगारांना मिळणार*

*शिधापत्रिकेचा लाभ*

केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत/असंघटीत कामगार ज्यांच्याकडे अद्याप रेशनकार्ड नाही, अशा कामगारांना प्रचलित निकषानुसार विशेष मोहिमेअंतर्गत तातडीने शिधापत्रिका वितरीत करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

संबंधित पोस्ट

न्यायप्रविष्ठ प्रकरणामध्ये प्रशासनाने हस्तक्षेप करु नये – अ‍ॅड.मगरे गरिबांवरील अन्याय सहन करणार नाही – जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरेदलित, आदीवासी, भुमिहिन कास्तकरांचे अतिक्रमण नियमानूकूलित करुन सातबारा द्या-

vishwatmaklokswamivarta

आर्टीच्या प्रशिक्षणाला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसादउमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत होणार- व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व; जात वैधता-प्रमाणपपत्र पडताळणी मोहिम दि.४ जुलैपर्यंत..

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

हातमाग कापड स्पर्धाः इफरा अंजूम प्रथम तर शबाना गिराम द्वितीय..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ,निवडणुकीतून 4 उमेदवारांची माघार, रिंगणात 3 उमेदवार..