vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

आर्टीच्या प्रशिक्षणाला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसादउमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत होणार- व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे

आर्टीच्या प्रशिक्षणाला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसादउमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत होणार- व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे

 

मुंबई, प्रतिनिधी: मातंग आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरिता आर्टीकडून कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा पूर्व प्रशिक्षण, विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्याकरिता इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणाचे गुगल फॉर्म भरण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला तरूणाईने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गुगल लिंक शेअर करण्यात आली. त्यामुळे मातंग समाजातील हजारो तरुणांनी एकाच वेळी फॉर्म भरण्यास सुरुवात केल्यामुळे गुगल फॉर्म लोड घेऊन हँग होत असल्याच्या अडचणी नागरीकांनी व्यक्त केल्या आहेत. भविष्यात अनेक उमेदवारांनी एकाचवेळी ऑनलाईन नोंदणी केली तरी अडचण येऊ नये यासाठी नोंदणी फॉर्मवर तांत्रिक विभागाचे काम सुरु आहे. लवकरच उमेदवारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरळीत होईल असे आर्टी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. वारे यांनी सांगितले.00000

संबंधित पोस्ट

बदलापूर येथे दि.18 फेब्रुवारी रोजी’नक्शा’ प्रकल्पाचा होणार शुभारंभ..

vishwatmaklokswamivarta

13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा अभियान* जिल्हाधिकारी संतोष पाटील* 

महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी पंचशिल धम्म ध्वज यात्रा आज जालन्यात नागपूर ते चैत्यभुमी दरम्यान पू.भन्ते विनाचार्य साधणार जनसंवाद

भिलवडी स्टेशन ते नांद्रे स्टेशन दरम्यानचा रस्ता15 ते 18 फेब्रुवारी कालावधीसाठी बंद.

vishwatmaklokswamivarta

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ;सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड अनिवार्य-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका विभागात पाणीपुरवठाविषयक जाहीर आवाहन- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवार, दि. 25 मे 2026 पासून 10 % पाणी कपात ..