vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवारी फोस्टेक प्रशिक्षण;हॉटेल, केटरींग व्यवसाय चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन

अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवारी फोस्टेक प्रशिक्षण;हॉटेल, केटरींग व्यवसाय चालकांनी सहभागी होण्याचे आवाहन

 

राज्य प्रतिनिधी -बुलढाणा : अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेदरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग व्यावसाय चालकांसाठी फोस्टेक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण मोफत असून मे. नर्मदा हॉटेल, चिखली रोड, बुलढाणा येथे होणार आहे. जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग अन्न व्यवसाय चालकांनी मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त प्रमोद पाटील यांनी केले आहे.

फोस्टेक प्रशिक्षण हा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा उपक्रम असून भारत सरकार आणि अन्न सुरक्षा आयुक्त यांचे निर्देशानुसार घेण्यात येत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, आणि केटरिंग व्यावसाय चालवण्याऱ्यांसाठी प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त असून केवळ अन्न सुरक्षा सुनिश्चित होत नाही, तर व्यावसायाची विश्वासार्हत आणि गुणवत्ता देखील वाढते. प्रशिक्षणाचा उद्देश अन्न सुरक्षा आणि स्वच्छता याबाबत जागरुकता निर्माण करणे व अन्न व्यावसाय चालकांना योग्य प्रशिक्षण देणे हा आहे.

फोस्टेक प्रशिक्षणामुळे अन्न सुरक्षा मानकांचे योग्य पालन करणे सोपे होते, ग्राहकांपर्यंत सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पोहोचवण्यासाठी मदत मिळते. तसेच ग्राहकांना हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन होत आहे, याची खात्री मिळते. स्वच्छता, अन्न हाताळणी, आणि आपात्कालीन स्थिती हाताळण्याबद्दल कर्मचारी अधिक जागरुक आणि प्रशिक्षित होतात. अन्न सुरक्षा मानकांचे पालन न केल्यास व्यवसायाला दंड किंवा परवाना रद्द होण्याचा धोका असतो. प्रशिक्षणामुळे हे धोके कमी होतात. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर सहभागी अन्न व्यवसाय चालकाना फोस्टेक प्रमाणपत्र दिले जाते.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या अधिकृत प्रशिक्षण भागीदारामार्फत प्रशिक्षण दिले जाणार असून सदर प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग व्यवसायाची परवाना प्रत, व्यवसायातर्फे सहभागी होणारे मालक, शेफ, सुपरवायजर यांचे आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक, अन्न व औषध प्रशासन बुलढाणा कार्यालयात जमा करावे अथवा प्रशिक्षण संस्थेच्या मोबाइल क्रमांक 9420440281 वर माहिती पाठवावी.000000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू  

पासपोर्ट अर्जदारांसाठी पुण्यात 8 एप्रिलला जनसंवाद सत्र

जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्स’च्या सणसवाडी प्रकल्पाचे उद्घाटन

रुग्णवाहिका चालक-मालकांनी रुग्णवाहिकेचे दरपत्रक,रुग्णवाहिकांच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे बंधनकारक..

vishwatmaklokswamivarta

लोकाभिमुख सामाजिक संस्थाचा आधारस्तंभ हरपला लोकमान्य टिळक यांचे पणतू, केसरीचे विश्वस्त डॉ. दीपक टिळक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजलीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण केली

विधानपरिषद कामकाज/ प्रश्नोत्तरे-उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित-सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले· जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार