vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रुग्णवाहिका चालक-मालकांनी रुग्णवाहिकेचे दरपत्रक,रुग्णवाहिकांच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे बंधनकारक..

रुग्णवाहिका चालक-मालकांनी रुग्णवाहिकेचे दरपत्रक,रुग्णवाहिकांच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे बंधनकारक..

ठाणे, प्रतिनिधी:- मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या दि. 19 जून 2020 रोजीच्या बैठकीमध्ये ठराव क्रमांक 18/2020 अन्वये रुग्णवाहिकेचे दर निश्चित करण्यात आले आहेत. या निर्णयातील अट क्रमांक 03 नुसार रुग्णवाहिकांचे दरपत्रक सर्व रुग्णवाहिकांच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे चालक व मालक यांना बंधनकारक करण्यात आले आहे.

वाहनाचा प्रकार – मारुती व्हॅन – 25 कि.मी. अथवा 2 तासांकरिता 700 रु., 25 कि.मी. अथवा 2 तासांनंतर लागू होणारे भाडेदर प्रति कि.मी. – 14 रु. वाहनाचा प्रकार – टाटा सुमो व मॅटॅडोर सदृश्य कंपनीने बांधणी केलेले वाहने – 25 कि.मी. अथवा 2 तासांकरिता – 840 रु., 25 कि.मी. अथवा 2 तासांनंतर लागू होणारे भाडेदर प्रति कि.मी. – 14 रु., वाहनाचा प्रकार – टाटा 407 स्वराज माझ्दा आदींच्या साच्यावर बांधणी केलेली वाहने – 25 कि.मी. अथवा 2 तासांकरिता- 980 रु., 25 कि.मी. अथवा 2 तासांनंतर लागू होणारे भाडेदर प्रति कि.मी. 20 रु., वाहनाचा प्रकार – आय.सी.यू. अथवा वातानुकुलित वाहने – 25 कि.मी. अथवा 2 तासांकरिता- 1190 रु., 25 कि.मी. अथवा 2 तासांनंतर लागू होणारे भाडेदर प्रति कि.मी.- 24 रु.

अटी व शर्ती:-1. वरील भाडेदर हे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रासाठी असून हे भाडेदर रुग्ण ॲम्ब्युलन्समध्ये बसल्यापासून संबंधीत हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याच्या व परतीच्या अंतरासाठी आहेत.

2. 25 कि.मी. पुढे अंतर गेल्यास प्रति कि.मी. भाडे व त्या मूळ भाडयात वाढवून एकूण भाडे ठरेल.

3. हे दरपत्रक सर्व रुग्णवाहिकांच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे चालक व मालक यांना बंधनकारक करण्यात यावे.

4. पहिल्या एक तासाच्या प्रतिक्षा कालावधीसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

5. पहिल्या तासानंतर प्रत्येक प्रतिक्षा तास 50 रुपये प्रति तास भाडे लागेल.

6. वर दर्शविलेल्या भाडयापेक्षा कमी अथवा मोफत सेवा देता येऊ शकेल. परंतु निश्चित केलेल्या भाडयापेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही.

7. वरील 25 कि.मी. च्या वर अंतर मोजताना जास्तीचे अंतरसुध्दा विचारात घ्यावे लागेल.

हे दर मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या सर्व क्षेत्रास लागू राहतील. काही रुग्णवाहिकेमध्ये ही बाब अंमलबजावणी होत असल्याचे आढळून येत नाही. तरी सर्व रुग्णवाहिका चालक व मालकांनी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची बैठक दि.19 जून 2020 मधील ठराव क्रमांक 18/2020 निर्णयातील अट क्रमांक 03 नुसार दरपत्रक सर्व रुग्णवाहिकांच्या आतील बाजूस प्रदर्शित करण्यात यावे, असे आवाहन ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सकस आहार देण्यास कटिबद्ध – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे 10 मे रोजी आयोजन जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा लाभ

पीककर्जासाठी शिबिरांचे आयोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविण्यासाठी कार्यक्रम जाहीर

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह ८ ते १४ एप्रिल दरम्यान साजरा होणार सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांची माहिती

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2025-26 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta