vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलाक्रीडा संकुल समितीच्या कामकाजाचा आढावा..

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलाक्रीडा संकुल समितीच्या कामकाजाचा आढावा..

सांगली, प्रतिनिधी: सर्व सामान्य नागरिकांपर्यंत क्रीडा सुविधा पोहोचवण्यासाठी कालबद्ध पद्धतीने प्रकल्प पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर आदि उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ग्रामीण व शहरी भागातील खेळाडुंना क्रीडा सुविधांचा लाभ होण्यासाठी प्रयत्न करावेत. पोलीस भरतीसह क्रीडा क्षेत्रात करियर करण्यास इच्छुक खेळाडुंना दर्जेदार क्रीडा सुविधा पुरवाव्यात. बॅडमिंटन कोर्टचे काम तातडीने सुरू होण्यासाठी कार्यवाही करावी. क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या खेळाडुंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी कराव्यात. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडु व खेळातून नोकरी मिळालेल्या खेळाडुंची माहिती संकलित करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा क्रीडा संकुल समितीअंतर्गत विविध विषयांचा आढावा घेतला. यामध्ये ४०० मी सिंथेटिक धावन मार्ग व नैसर्गिक गवताचे फुटबॉल मैदान तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य दर सूची मध्ये नमूद नसणारे दर विहित पद्धतीचा अवलंब करून दरपत्रक मागणी, जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉल आतून व बाहेरून रंगरंगोटी, जिल्हा क्रीडा संकुल परिसरात बुद्धिबळ भवन उभारणी, वास्तुविषारद नियुक्ती, खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी प्रशिक्षक नियुक्ती आदिंबाबत चर्चा करून मान्यता देण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी सादरीकरण केले

संबंधित पोस्ट

वृत्त विशेष- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धेत लातूर विभागातील चार बसस्थानकांची उत्कृष्ट कामगिरी

vishwatmaklokswamivarta

महसुलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा नांदेडमध्ये थाटात प्रारंभ· माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण..

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांनी गोव्यात झालेल्या आयर्नमॅन 70.3 सारख्या स्पर्धांमधील युवकांच्या वाढत्या सहभागाचे स्वागत केले आयर्नमॅन ट्रायथलॉन यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अनामलाई आणि तेजस्वी सूर्या या तरुण सहकाऱ्यांचे पंतप्रधानांनी केले कौतुक

vishwatmaklokswamivarta

राज्य लॉटरीच्या ऑक्टोबर महिन्यातील-मासिक, साप्ताहीक सोडतीचा निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

उन्हाळी हंगामासाठी पाणी मागणीचे अर्ज २४ मार्चपर्यंत सादर करावेत

जिल्हाधिकारी स्वामी यांनी केली पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी