vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्याने कोट्यवधी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, अर्थसंकल्पाचे स्वागत…केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांचे आभार-उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्याने कोट्यवधी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा, अर्थसंकल्पाचे स्वागत…केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांचे आभार-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबई, प्रतिनिधी- “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीय देशवासियांना मोठी भेट दिली आहे. अर्थसंकल्पातील नव्या कररचनेमुळे 12 लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांना 80 हजारांची सूट दिल्याने त्यांना शंभर टक्के करमाफी मिळणार आहे. 18 लाख उत्पन्नधारकांना 70 हजारांचा फायदा होणार आहे. 25 लाख उत्पन्न असलेल्यांचा कर 1 लाख 25 हजारांनी कमी होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 50 हजारांहून 1 लाख करण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांवरील 36 जीवनावश्यक औषधांवरील सीमाशुल्क संपूर्ण माफ केल्याने ही औषधे स्वस्त होणार आहेत. मोबाईल फोन देखील स्वस्त होणार असल्याने देशातील प्रत्येक घराला, व्यक्तीला या निर्णयाचा लाभ होईल. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाला असून त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे जाहीर आभार,” असे सांगत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला हे मिळाले.

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एमयुटीपी-3 प्रकल्पासाठी 1465 कोटी 33 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुळा मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत 230 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी 4 हजार 3 कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे – प्रशिक्षण संस्थेसाठी 126 कोटी 60 लाख, मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी 683 कोटी 51 लाख, महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी

संबंधित पोस्ट

सनातन संस्थेच्या वतीने ‘हिंदु राष्ट्ररत्न’ व ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार !हिंदु राष्ट्ररत्न : अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन;  सनातन धर्मश्री : मंत्री कपिल मिश्रा, चित्रपट निर्माते विपुल शहा, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, गौरीशंकर मोहता, शिल्पकार प्रमोद कांबळे

महाराष्ट्राने एक निर्भीड, कार्यक्षम आणि प्रशासनावर सखोल पकड असलेला कणखर नेता गमावला – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

मुंबईत रिमझिम पाऊस तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता…मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

vishwatmaklokswamivarta

74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा…

vishwatmaklokswamivarta

महसूल सप्ताहानिमित्त”विविध कार्यक्रमांचे आयोजन”नागरिकांनी महसूल सप्ताहाचा लाभ घ्यावा  – विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

vishwatmaklokswamivarta

विक्रोळी मध्ये बनावट कागद पत्रे आणि बनावट ओळखपत्र बनवून म्हाडा गृहनिर्माण,जागा विकणारी टोळी सक्रिय,गंभीर घोटाळ्याची तात्काळ चौकशी करण्याची मागणी…