छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार वाहनांस HSRP(High Security Registration Plates) बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व वाहनाधारकांना त्यांच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्याकरीता प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सुचना जारी केल्या आहेत.
१. वाहनांना नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना HSRP आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशही देण्यात आले आहे.
२. जिल्ह्याकरीता M/s Real Mazon India Ltd ही एजन्सी निश्चित करण्यात आलेली असून HSRP नंबर प्लेट बसविण्याकरीता बुकींग पोर्टल https://maharashtrahsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आले आहे.
३. वाहनधारकांनी वरील पोर्टलवर बुकींग करुन त्यांच्या सोईप्रमाणे वेळे घेऊन HSRP बसवून घेण्यात यावी.
४. वाहनधारक जिल्ह्यातील कार्यालयातील नोंदणी धारक नसला तरी काही कामानिमित्त जिल्ह्यात वाहनधारक वाहन वापरत असेल तरीदेखील या वाहनास HSRP नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे.
५. HSRP नंबर प्लेट बसविण्याकरीता पुढीलप्रमाणे शुल्क जीएसटी वगळून आकारण्यात येणार आहे.
दुचाकी / ट्रक्टर शुल्क ४५० रु., तीन चाकी ५०० रु., इतर सर्व वाहने ७४५ रु.
६. वाहनधारकांना त्यांच्या वाहनावर HSRP नंबरप्लेट बसविण्या संदर्भात काही तक्रार असल्यास संबंधित सेवापुरवठाधारकाच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे तक्रार दाखल करु शकतात.
७. जिल्ह्यातील नागरिकांना सुचित करण्यात येते की, त्यांच्या वाहनावर HSRP नंबरप्लेट न बसवल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे व उतरविणे दुय्यम प्रत, विमा अद्ययावत करणे इ. कामकाज थांबविण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी.
८. याद्वारे HSRP नंबर प्लेट वाहने बनावट HSRP नंबर प्लेट असलेली वाहने इ. वाहनांवर कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी.असे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी कळविले आहे.०००००