vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रॅगिंगविरोधी कायद्यासह विविध कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती

रॅगिंगविरोधी कायद्यासह विविध कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्री. एस.बी.अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्रीमती रेवती म. कंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (१३ ऑगस्ट रोजी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील होत्या. यावेळी ज्येष्ठ पॅनल वकील अॅड. के. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगविरोधी कायद्याबाबत मार्गदर्शन केले. रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक व शैक्षणिक जीवनावर होणारे गंभीर परिणाम, रॅगिंगविरोधी कायद्यातील तरतुदी तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

रॅगिंगच्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांपर्यंत कारावास आणि दहा हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून, महाविद्यालयातून प्रवेश रद्द होणे तसेच पुढील प्रवेशावर बंदी यांसारखी कठोर कारवाई होऊ शकते, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. रॅगिंगबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर संस्थेच्या प्रमुखांनी नियमानुसार चौकशी करून आवश्यक ती कारवाई करणे बंधनकारक असल्याचेही अॅड. के. डी. पाटील यांनी सांगितले.

पॅनल वकील अॅड. विक्रांत पाटील यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिन तसेच अमली पदार्थांचा गैरवापर व व्यसनाधीनतेचा धोका याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘अमली पदार्थांचा गैरवापर व व्यसनाधीनतेचा धोका नष्ट करणे’ या विषयासह अमली पदार्थमुक्त भारतासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनेंतर्गत अमली पदार्थांविषयी जनजागृती, शिक्षण, प्रतिबंध आणि पुनर्वसनाच्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव रेवती म. कंटे यांनी कायद्याचे ज्ञान हे सुरक्षित आणि जबाबदार समाजनिर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरोधात कायदेशीर मार्गाने आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांनी विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती घेऊन जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक भूमिका बजावावी, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समाजसेवा अधिकारी नम्रता रणसिंग यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक प्राध्यापक डॉ. संतोष बिडे यांनी आभार मानले.

या कार्यक्रमास वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, डॉक्टर, कर्मचारी तसेच विधी स्वयंसेवक सुशील साईकर, पूनम रांजणकर आणि अक्षय सांदणकर उपस्थित होते.

000000

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिन; मुख्य कार्यक्रम बिबी का मकबराच्या प्रांगणात,नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

दिल्लीतील १७ मेट्रो स्थानके आज सकाळी ०७:३० वाजेपासून पुढील आदेशापर्यंत बंद; राजीव चौक, मंडी हाऊस आणि केंद्रीय सचिवालयात इंटरचेंज सुविधा सुरू!

नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजुरी…

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी सुट्टी द्यावी*कामगार उपायुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अनंत चतुर्दशी दिनी होणा-या श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुव्यवस्थित नियोजन

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील चार गावांसाठी टँकर मंजूर