vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास निधी-उपलब्ध करुन देऊ- पालकमंत्री संजय शिरसाट

अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास निधी-उपलब्ध करुन देऊ- पालकमंत्री संजय शिरसाट

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे उत्तम स्मारक पुतळ्याच्या रुपाने उभे रहावे. तसेच सर्वोपयोगी अद्यावत सभागृह उभारले जावे. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकविचाराने अशा लोकोपयोगी कमांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देऊ,असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी येथे दिले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशिभिकरण या कामाचे भुमिपूजन आज पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागासवर्ग कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत, संजय ठोकळ, राजेंद्र जंजाळ तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

  पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, पुतळ्याचे सुशोभिकरण व परिसराचा विकास ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कदाचित हे चांगले काम माझ्या हातून व्हावे असे होणार असावे. आता सर्व लोकप्रतिनिधी हे एक विचारांचे आहेत. अशा चांगल्या कामासाठी आम्ही निधी आणून हे काम पूर्ण करु. समाज हिताच्या या कामाच्या गुणवत्तेत तडजोड करणार नाही. उत्तम दर्जाचे काम करु. पुतळा, परिसर विकास व सभागृह अशा कामांसाठी निधी उपलब्ध करुन देऊ,असे आश्वास पालकमंत्री शिरसाट यांनी दिले.

  इमाव कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे समाजाला बोध देणारे साहित्य आहे. हे साहित्य सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजे. प्रत्येकाने ते वाचायला हवे. अण्णाभाऊ साठे यांचे यथोचित स्मारक आणि परिसराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण वचन बद्ध आहोत,असे त्यांनी सांगितले.  प्रास्ताविक संजय ठोकळ यांनी केले. पंचशिला भालेराव व त्यांच्या कलापथकातील कलावंतांनी अण्णाभाऊ साठे यांची गाणी सादर केली. विनोद साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.०००००

संबंधित पोस्ट

पंतप्रधानांनी सेमिकॉन इंडिया 2025 दरम्यान प्रमुख सीईओंशी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या स्वागतासाठी नांदेड नगरी सज्ज ; जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; कार्यक्रमासाठी प्रवेश पासची आवश्यकता नाही

vishwatmaklokswamivarta

नाशिकला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होणार : मंत्री डॉ उदय सामंत 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 या कालावधीत नाशिकला होणार विश्व मराठी संमेलन

राज्यात नव्या प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या स्थापनेसाठी निकष निश्चित – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अमली पदार्थ विरोधात राज्यात आदर्श ठरेल असे मॉडेल राबवावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटीलअमली पदार्थ टास्क फोर्सच्या तिसऱ्या बैठकीत दिले निर्देश..

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व हरित कुंभसाठी सर्वांचे योगदान आवश्यक : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध विकास कामांचे भूमीपूजन

vishwatmaklokswamivarta