vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भाजपा सक्रीय सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात..

भाजपा सक्रीय सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात..

जालना (प्रतिनिधी) : – राज्यात भाजप पक्षाच्या सक्रीय सदस्यता नोंदणी अभियान सुरु झाले आहे, भाजपा नेते तथा माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी च्या सक्रीय सदस्य नोंदणीला आजपासून (दि.२२) सुरुवात करण्यात आली.

सक्रीय सदस्य होण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्याला १०० सक्रिय सदस्य करावे लागणार आहेत, अन्यथा सक्रीय सदस्य होता येणार नाही. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी १०० नवीन सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून ते सक्रिय सदस्यत्वासाठी पात्र ठरतील. प्रत्येक सक्रिय सदस्याला नमो अॅपद्वारे १०० रुपये सदस्यता शुल्क भरावे लागेल.

यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे, विजय कामड, विमलताई आगलावे, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्याताई देठे, महानगर महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा शुभांगीताई देशपांडे, बेटी बचाव बेटी पढाव जिल्हा संयोजिका अरुणाताई जाधव, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, जिल्हा उपाध्यक्ष राजू गवई, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुदर्शन काळे, हिराबाई सुदर्शन काळे, राजेश जोशी, उद्धव ढवळे, सुधाकर शिंदे, विष्णू दराडे यांनी भाजपा सक्रीय सदस्यता नोंदणी करून घेत भाजपा पक्षाचे सक्रीय सदस्य झाले आहेत.

संबंधित पोस्ट

लंडनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र’ उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय- मराठी भाषा मंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सदिच्छा भेट

vishwatmaklokswamivarta

वाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्न उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विविध मागण्या; शेतकरी महिलांना जमिनीच्या अधिकारासाठी शासन प्रयत्नशील..

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026बदलापूर क्रीडामय, राज्‍य व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्‌घाटन,बदलापूरमध्ये इनडोअर स्‍टेडियम उभे करणार -आमदार किसन कथोरे

मुंबई शहर व उपनगरात म्हाडाच्या जागांवरील अनधिकृत बांधकाम;चौकशी करून कारवाई होणार- मंत्री उदय सामंत