vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पाणी टंचाईः प्रत्यक्ष पाहणी करुन प्रस्ताव-सादर करावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पाणी टंचाईः प्रत्यक्ष पाहणी करुन प्रस्ताव-सादर करावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी उन्हाळा कालावधी जवळ येत असतांना काही गावांमधून पाणी टंचाईची माहिती मिळत आहे. तेव्हा तहसिलदार, तलाठी, ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन टंचाई नियोजनासाठी प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

  जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभुमिवर आज जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तर जिल्हा मुख्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके सहभागी झाले होते.

   पाणीटंचाईचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक तलाठी, ग्रामसेवक यांनी तातडीने भेट देऊन पाहणी करावी. पाण्याची उपलब्धता, त्याचे स्रोत, मिळणाऱ्या पाण्याची गुणवत्ता इ.बाबत पाहणी करावी. त्यानुसार आठ दिवस आधी प्रस्ताव पाठवावा. याच कालावधीत पाणी बचतीसंदर्भात जनजागृतीही करावी. या सोबतच रोजगार हमी योजना, आरोग्य सेवा इ. बाबत नियोजन करावे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक सौर ग्राम तयार करावयाचे असल्याने त्यासाठी प्रत्येक तालुक्यातून एका गावाची पाहणी करुन निवड करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

०००००

संबंधित पोस्ट

नागपूर मेट्रो टप्पा-२ विस्तारास व सागरी सेतू-वांद्रे किल्ला कनेक्टरला मान्यता मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती बैठक

समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांची साथ आवश्यक – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

३ ते १५ ऑगस्टदरम्यान जनजागृतीचे विविध उपक्रम; “अवयवदान-जीवनदानाचा सर्वोत्तम संकल्प” अभियानाला सुरुवात

हिंद दी चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदेड क्षेत्रीय प्रचार समितीकडून व्यापक जनजागृती अभियान

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीचे ‘चुरचुरा’ गाव १०० टक्के धूरमुक्त मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी सहपालकमंत्र्यांचा मोठा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

कोलंबियामधील बुकारामंगा इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारताच्या पाचही विद्यार्थ्यांनी पटकावली सुवर्ण पदके