vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

रायगड जिल्ह्यात २० हजार ४८९ घरकुलांचे महिलांच्या हस्ते भूमिपूजन  जागतिक महिलादिन घरकुलयोजना…

रायगड जिल्ह्यात २० हजार ४८९ घरकुलांचे महिलांच्या हस्ते भूमिपूजन  जागतिक महिलादिन घरकुलयोजना…

राज्य प्रतिनिधी-महिला दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात पंतप्रधान जन मन योजनेंतर्गत २० हजार ४८९ घरकुलांचे भूमिपूजन ठिकठिकाणी महिलांच्या हस्ते करण्यात आले. या अनुषंगाने अलिबाग पंचायत समितीमार्फत वाडगांव आदिवासी वाडी येथे १९ घरकुलांचे भूमिपूजन कार्यक्रम जिल्हाधिकारी किशन जावळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत पार पडला. घरकुलांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना किशन जावळे व डॉ. भरत बास्टेवाड यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक राहूल पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, वाडगांव ग्रामपंचायत सरपंच सारिका पवार, उपसरपंच जयेंद्र भगत उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात पंतप्रधान जनजाती आदिवासी न्यास अभियान मार्फत पी.एम. जन मन योजनेंतर्गत घरकुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यात २० हजार ४८९ घरकुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे‌. शनिवारी महिला दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी या घरकुलांचे भूमिपूजन महिलांच्या हस्ते करण्यात आले. या अनुषंगाने अलिबाग पंचायत समितीच्या माध्यमातून वाडगांव आदिवासी वाडी येथे १९ घरकुलांच्या भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

वाडगांव हे स्वच्छ व सुंदर गाव आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला १०० टक्के कर वसुली करणारी वाडगांव ग्रामपंचायत आहे. गावातील उर्वरित घरकुलांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत. गावात कुणी निरक्षर लोक असतील तर त्यांच्यासाठी वर्ग सुरू करून वाडगांव १०० टक्के साक्षर करू या. तसेच गावातील लोकांना सर्व योजनांचा लाभ मिळेल या दृष्टीने काम करुन, येथील आदिवासी वाडीचा सर्वांगीण विकास करण्यात येईल.: किशन जावळे जिल्हाधिकारी, रायगड पी.एम. जन मन योजनेंतर्गत जिल्ह्यात २० हजार ४८९ घरकुलांचे महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येत आहे. महिलांच्या हस्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुलांचे भूमिपूजन करण्याचा हा राज्यातील पहिलाच कार्यक्रम ठरेल. सर्व घरकुलांचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच वाडगांव आदिवासी वाडीवरील १९ घरकुलांची कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.:डॉ. भरत बास्टेवाड

संबंधित पोस्ट

विविध कृषी पुरस्कारांकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध

महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी – राज्य निवडणूक आयुक्त

vishwatmaklokswamivarta

जायकवाडीतील उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करा – पालकमंत्री संजय शिरसाट नाथसागर जलाशयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन

दक्षता जनजागृती सप्ताह २०२५ भ्रष्टाचाराची तक्रार १०६४ टोल फ्री क्रमांकावर करा

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या हस्ते स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिम आणि घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 संदर्भातील राष्ट्रीय जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा संकल्पनेला बळ देण्याकरिता पुढाकार घेण्याचेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन,आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा..दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta