vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कन्नड-सोयगाव मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्या- मंत्री गुलाबराव पाटील

कन्नड-सोयगाव मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्या- मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, प्रतिनिधी : कन्नड-सोयगाव मतदारसंघातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशनच्या प्रलंबित पाणीपुरवठा योजना दोन महिन्यांत पूर्ण कराव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. वन विभागाचे आवश्यक परवाने घेऊन जलवाहिन्यांच्या कामांना गती द्यावी, असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.मंत्रालयात आयोजित कन्नड-सोयगाव मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजना जाधव-दानवे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अधीक्षक अभियंता अजय सिंह, छत्रपती संभाजीनगरचे अधीक्षक अभियंता दीपक कोळी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे आदी उपस्थित होते.

तांत्रिक अडथळ्यांवर तातडीने तोडगा काढा

मंत्री श्री. पाटील म्हणाले, जल जीवन मिशनअंतर्गत दिलेल्या १०० दिवसांच्या उद्दिष्टांची कामे तत्काळ मार्गी लावावीत. कन्नडमधील सिरसाळा आणि इतर चार गावांसाठी सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कार्यवाही तांत्रिक अडथळे दूर करून या महिन्यात पूर्ण करावी. रेल व कनकावतीनगर, देवगाव रंगारी, पिशोर आणि अन्य तीन गावांच्या पाणीपुरवठा योजनांबाबतही प्रलंबित कार्यवाही वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत जिल्हा परिषदेंतर्गत सुरु असलेली कामे तातडीने मार्गी लावावीत. ४८ रखडलेल्या प्रकल्पांना अधिक कालावधी लावणाऱ्या ठेकेदारांना संरक्षण न देता कठोर कारवाई करावी. केवळ दंड न करता काम न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

संबंधित पोस्ट

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरतीसाठी सुधारित जाहिरात..

vishwatmaklokswamivarta

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस प्रशासनाने सतर्क राहून मदत कार्य करावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना निर्देश

राष्ट्रध्वजाच्या योग्य वापराबाबत आवाहन

कन्नड येथे पथदर्शी प्रकल्प; शहरी भागात ड्रोनद्वारे जमिन मोजणी‘नक्शा’साठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक गुंतवणूक, कृषिमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार – पणन मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

किनगाव राजाची लखन-दुर्गा ठरली रांजणी केसरीचे मानकरी*बैलजोडी मालाकला सतीश घाटगेकडून मिळाली दुचाकी भेट

vishwatmaklokswamivarta