vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऐतिहासिक महाडमध्ये भीमसृष्टी उभारणार – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट चवदार तळे सत्याग्रहाचा ९८ वा वर्धापन दिन सोहळा

ऐतिहासिक महाडमध्ये भीमसृष्टी उभारणार – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट चवदार तळे सत्याग्रहाचा ९८ वा वर्धापन दिन सोहळा..

रायगड, प्रतिनिधी: ऐतिहासिक महाडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती देणारी भीमसृष्टी उभारण्यात येईल, यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली.

महाड येथे मानव समाजाला समानता व समतेचा संदेश देणाऱ्या चवदार तळे सत्याग्रहाचा 98 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, डॉ. भदंत राहुल बोधी, समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव, नागसेन कांबळे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.राज्य शासनाच्या वतीने रायगड पोलीस दलाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. तसेच यावेळी हेलिकॉप्टरमधून चवदार तळे परिसरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

चवदार तळे सुशोभिकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेल्या 7 कोटी रुपयांच्या तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाच्या तीन कोटी रुपयांची कामे तातडीने सुरू केली जातील, असेही मंत्री शिरसाट यांनी सांगितले. चवदार तळे येथील पाण्याच्या शुद्धीकरणासाठी फिल्टरेशन प्लांट लावण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी मंत्री गोगावले यांनी चवदार तळे सत्याग्रहाच्या शतकपूर्ती वर्धापन दिनासंदर्भात शासन तातडीने मंत्रिमंडळाच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये कार्यक्रमाची निश्चिती करण्यात येईल, असे सांगितले.

चवदार तळे सत्याग्रहाच्या 98 व्या वर्धापन दिनाला संपूर्ण देशभरातून लाखो अनुयायी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या सर्व भीम अनुयायांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. यावेळी मान्यवरांनी क्रांतीस्तंभ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

संबंधित पोस्ट

भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप

महाराष्ट्र शासनाचे २८ वर्षे मुदतीचे८०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

जागतिक सायकल दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी अर्बन अड्डा २०२५ ला उपस्थिती लावली आणि “सायकलिंग, चिल्ड्रन अँड सिटीज” आणि “रोड टू सायकल२स्कूल” या पुस्तकांचं केलं प्रकाशन.

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

जेईई, नीटसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी ‘आर्टी’चे प्रशिक्षण केंद्र निवडावे – व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे

vishwatmaklokswamivarta

जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा विषयक स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक

vishwatmaklokswamivarta