vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रवाना

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा ‘जागतिक वारसा दर्जा’ मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅरिसला-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार याच्या नेतृत्वात शिष्टमंडळ रवाना

मुंबई, प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आज पॅरिसला गेले आहे.

महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (Maratha Military Landscape of India) या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. याबाबतचे सादरीकरण पूर्ण क्षमतेने प्रभावीपणे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ गेले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचा राज्य शासनाचा प्रस्ताव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोकडे पाठवला, त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे व सादरीकरणासाठी जाण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मंत्री ॲड.शेलार यांनी आभार मानले आहेत.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यांचे शिष्टमंडळ २२ ते २६ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे गेले आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.शेलार करणार आहेत. इतर सदस्यांमध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे.

या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्याद्वारे, या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येईल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होईल. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास, या किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारशाचे महत्व आणि जतन सुनिश्चित होईल, अशी आशा ॲड.आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

 

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेने उभारली ८०० कोटींच्या मालमात्ताकर वसुलीचे उद्दिष्ट गाठणारी गुढी ….

केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीने,पेनटाकळी येथील गावकऱ्यांचे उपोषण मागे.. 

vishwatmaklokswamivarta

लालबागच्या राजाचा दर्शनाचा लाईव्ह सोहळा, गणपती बाप्पा मोरया- विश्वात्मक लोकस्वामी वार्ता वेबसाईट न्यूज पोर्टलवर

vishwatmaklokswamivarta

समाजसेविका कल्पना शिंदे यांना जीवन गौरव पुरस्कार संस्थापक अध्यक्ष बाबुराव माने यांच्या तालुक्याच्या वतीने सन्मान

जिल्हा माहिती कार्यालयाचे प्रचार रथ मार्गस्थ; 230 गावांमध्ये पोहोचणार शासनाच्या योजनांची माहिती

मुंबईकरांसाठी मोठी बातमी: रेल्वेने विनातिकीट प्रवास केल्यास आता दुप्पट दंड! लवकरच अधिसूचना होणार जाहीर