vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठी नववर्षारंभ दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाचा उपक्रम बुधवारी (दि.२ एप्रिल) जिल्ह्यात ‘कन्या दिन’ साजरा होणार

मराठी नववर्षारंभ दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाचा उपक्रम बुधवारी (दि.२ एप्रिल) जिल्ह्यात ‘कन्या दिन’ साजरा होणार

 

छत्रपती संभाजीनगर,द प्रतिनिधी)- जिल्ह्यात मुला-मुलींच्या असमान प्रमाणामुळे चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुलींच्या जन्मदर वाढविण्यासाठी आणि PCPNDT कायद्याचा व्यापक प्रसार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, बुधवार दि.२ एप्रिल रोजी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर ‘कन्या दिन’ साजरा करण्यात येणार आहे. याबाबत तालुका, उपविभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

    मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे. ‘बेटी बचाओ अभियाना’ला गती देण्यासाठी आणि मुलींच्या जन्माचे महत्त्व समाजात रुजवण्यासाठी यानिमित्त विविध उपक्रम राबवले जातील.

महत्त्व आणि उद्दिष्टे:

PCPNDT कायद्याची जनजागृती.मुलगी जन्माला यावी यासाठी समाजप्रबोधन

लिंगनिदान चाचण्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी जनजागृती ग्रामपंचायत स्तरावर ‘बेटी बचाओ’ चळवळीला चालना

महिला आणि मुलींच्या सन्मानासाठी विशेष कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन:.मंगळवार दि. १ एप्रिल रोजी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येईल. तसेच दि.३०, ३१ मार्च आणि १ एप्रिल या तारखांना गावोगावी कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्यात येईल. कार्यक्रमा दरम्यान महिला आणि बालिकांच्या प्रगतीवर व्याख्याने, मार्गदर्शन सत्रे, सांस्कृतिक स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि महिला आरोग्यावर चर्चा यांसारखे उपक्रम राबवले जातील. विशेषतः मुलींच्या शिक्षणास चालना देणाऱ्या आणि सामाजिक योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार केला जाईल.०००००

संबंधित पोस्ट

सक्रीय बांधकाम कामगारांना वितरीत करण्याच्या-अत्यावश्यक संचाच्या वाटपाबाबत जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जालना महानगरपालिका – 372 नळ कनेक्शनचे नियमितीकरण 2715600 रुपये वसुल.

vishwatmaklokswamivarta

शून्यातून विश्व निर्माण करणारी ‘केक क्वीन’: सातारच्या स्मिता बेंद्रे*

गडचिरोलीतील बंगाली बांधवांना मिळणार जमिनीचा मालकी हक्क – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ४० हजार बंगाली नागरिकांना मोठा दिलासा

राष्ट्रीय पशुधन योजना अंतर्गत पशुपालकांना लाभ देण्यासाठी सक्रिय पावले

चोंडी – चापडगाव परिसरात तात्पुरता रेड झोन घोषित ड्रोन उडविण्यास सक्त मनाई