vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत…

शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत…

पुणे, प्रतिनिधी: शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमाअंतर्गत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, आलेगाव पुनर्वसन या शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.

यावेळी गट विकास अधिकारी महेश ढोके, गटशिक्षणाधिकारी संजय महाजन, विस्तार अधिकारी शरीफा तांबोळी, केंद्र प्रमुख आशा धाडगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वीरधवल (बाबा) जगदाळे आदी उपस्थित होते.

आज शालेय जीवनातील आठवणीला उजाळा मिळाला असे सांगून श्री. पवार म्हणाले, भावी पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासोबतच सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे ही राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, याकरिता राज्य शासन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना अडीअडचणी येणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. शिक्षकानेही विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याच्यादृष्टीने अध्यापन केले पाहिजे.

राज्य शासनाने १० कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका वृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन केले पाहिजे. यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांवर पर्यावरण विषयक संस्कार होण्यास मदत होईल या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले.यावेळी आलेगाव पुनवर्सनचे सरपंच नवनाथ झुंबर-कदम, मुख्याध्यापिका अनिता खताळ, ग्रामसेवक अर्चना भागवत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी कुतवळ आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मिहान प्रकल्पातील पुनर्वसन धोरणानुसार नियोजन करुन सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

भारताचे पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील मोदीज् मिशन’ या सुप्रसिद्ध वकील बर्जिस देसाई लिखित पुस्तकाचं प्रकाशन उद्या राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार. 

vishwatmaklokswamivarta

माओवादविरोधी अभियानात उल्लेखनीय कामगिरी, शौर्य आणि कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे गडचिरोली पोलीस दलातील ५ सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती प्रदान

दरड कोसळल्याने किल्ले रायगडाचा पायरी मार्ग दोन दिवसांसाठी बंद

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन