vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्यात दुर्दैवी घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत रिक्षा चालकाने  गतिमंद महिलेला मुंब्र्यातील अज्ञात स्थळी नेऊन बलात्कार, आरोपी अटक…

राज्यात दुर्दैवी घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत रिक्षा चालकाने  गतिमंद महिलेला मुंब्र्यातील अज्ञात स्थळी नेऊन बलात्कार, आरोपी अटक…

 राज्य प्रतिनिधी –

डोंबिवलीत एका रिक्षा चालकाने गतीमंद महिलेवर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपी रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार-डोंबिवलीत खळबळजनक दुर्दैवी घटना समोर आली आहे ,फैजान खान असे अत्याचार करणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव आहे. फैजान हा 21 वर्षांचा आहे. त्याने 30 वर्षाच्या महिलेवर बलात्कार केला आहे.   टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासात आरोपी फैजान खानला बेड्या ठोकल्या.

डोंबिवलीत घडलेल्या या घटेमुळे खळबळ उडाली आहे. गतिमंद महिला आपल्या नातेवांकडे जाण्यासाठी सोनार पाडा येथून रिक्षामध्ये बसली होती. आरोपी फैजल खान यांनी गतिमंद असल्याचा फायदा घेत पीडित महिलेला निश्चित स्थळी न घेऊन जाता आरोपी खान याने या महिलेला मुंब्रा येथे अज्ञात स्थळी नेले. येथे आरोपी ने तिच्यावरती अमानुष अत्याचार केला आहे.

पीडितेने दुसऱ्या दिवशी सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर तिच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी आपली चक्र फिरवत आरोपी फैजल खान याला अटक केली. आरोपीला कल्याणच्या न्यायालयामध्ये हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे याप्रकरणी टिळक नगर पोलीस घटनास्थळी जाऊन या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे.

संबंधित पोस्ट

कल्याणमधला धक्कादायक प्रकार-मराठी तरुणीला परप्रांतीय कडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने रॅपिडो या ऑनलाईन प्रवास प्रदान करणाऱ्या कंपनीवर दिशाभूल करणारी जाहिरात केल्याबद्दल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला

vishwatmaklokswamivarta

मुंबई-पुणे मिसिंग लिंक लवकरात लवकर पूर्ण करा- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

वॉर रूम’आणि पॉलिसी-आधारित विकास मॉडेलमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महानगरपालिका क्षेत्रात डिजिटल जनगणनेला वेग

नदी सुशोभीकरणापेक्षा प्रदूषणमुक्तीवर अधिक भर; स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ लवकरच -पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे