vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 102 प्रकरणे पात्र

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 102 प्रकरणे पात्र

 

 सांगली द प्रतिनिधी.) :- राज्य शासनाच्या प्रशासकिय विभागांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आलेला आहे. क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरीता 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार प्रभावीपणे कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने संजय गांधी योजना सांगली शहर अध्यक्ष तथा तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे झालेल्या बैठकीत एकूण 102 प्रकरणे पात्र करण्यात आल्याची माहिती तहसिलदार (संगायो) मनोजकुमार ऐतवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

बैठकीत एकूण 160 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी संजय गांधी योजना 102 पैकी 60 पात्र व 42 अपात्र. श्रावणबाळ योजना एकूण 58 पैकी 42 पात्र व 16 प्रकरणे अपात्र करण्यात आली. अशी एकूण 102 प्रकरणे पात्र करण्यात आली.

 या बैठकीस महसूल सहायक संदीप पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते. माहे मे 2025 मध्ये पुढील बैठक होणार असून सर्व संबंधितांनी अर्ज करावेत, असे आवाहन तहसिलदार श्री. ऐतवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य-: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी..

vishwatmaklokswamivarta

एआय’च्या वापरामुळे नवउद्योगाला उज्ज्वल भविष्य-भारतीय उद्योजकतेचे भवितव्य चर्चासत्रातील सूर

बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक आज दुपारी 12 वाजता लोकसभेत मांडले जाणार♦️आठ तास चर्चा होण्याची शक्यता चर्चेसाठी आवश्यक वाटल्यास वेळ वाढवण्यात येईल.- संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू

पराक्रम दिना’ निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन थोरले बाजीराव पेशवे जयंती निमित्त राज्यभर कार्यक्रम

26 ते 28 सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत

vishwatmaklokswamivarta

15 ते 18 मे कालावधीत जिल्ह्यात यलो अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*