vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

वेव्हज परिषद-2025’निमित्त ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात सचिव डॉ. अन्बळगन पी. यांची मुलाखत

वेव्हज परिषद-2025’निमित्त ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात सचिव डॉ. अन्बळगन पी. यांची मुलाखत

बुलढाणा, प्रतिनिधी- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’वेव्हज-2025 परिषदेनिमित्त उद्योग विभागाचे सचिव डॉ. अन्बळगन पी. यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 29 एप्रिल 2025 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री 8.00 वा. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स- https://twitter.com/MahaDGIPR,

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR,

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR,

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’म्हणजेच ‘वेव्हज-2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद 1 ते 4 मे 2025 या कालावधीत जिओ कन्व्हेशन सेंटर, बीकेसी, मुंबई येथे होणार आहे. जगभरातील विविध देशांमधील मनोरंजन आणि निर्मितीशी संबंधित क्षेत्रातील मान्यवर यानिमित्ताने एकत्र येणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून भारताच्या सर्जनशील शक्तीला, क्रिएटीव्ह इकॉनॉमीला चालना मिळणार आहे. यानिमित्त होणारे नियोजित कार्यक्रम आणि तयारीबाबत उद्योग विभागाचे सचिव डॉ. अन्बळगन पी. यांनी ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात माहिती दिली आहेआहे.

000000

संबंधित पोस्ट

अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल- उपमुख्यमंत्री अजित पवारश्री क्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिर परिसर विकास आराखड्यांतर्गत कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

मुंबई सह उपनगरात धावणार अत्याधुनिक वंदे-मेट्रो लोकल

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण पाणी गुणवत्ता व्यवस्थापन आणि शुद्ध पाणी पुरवठ्याचे महत्त्व

vishwatmaklokswamivarta

रक्षाबंधन निमित्त द चिल्ड्रन एड संस्थेस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट..

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी – राज्य निवडणूक आयुक्त

vishwatmaklokswamivarta