vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विशेष लेख -:आर्थिकदृष्ट्या “गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य” करण्या आहे दक्ष..आपला ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’

विशेष लेख -:आर्थिकदृष्ट्या “गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य” करण्या आहे दक्ष..आपला ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’

 

राज्य प्रतिनिधी -राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, त्यानुसार या कक्षाचे आज 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री / मंत्री/ राज्यमंत्री यांच्या हस्ते संपूर्ण राज्यात उद्घाटन करण्यात आले. या कक्षाचे प्रमुख म्हणून रामेश्वर नाईक हे अत्यंत संवेदनशीलतेने जबाबदारी सांभाळीत आहेत.

राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय काढण्यात आला. शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाची दि.23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती, या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याबाबत निर्देश दिले होते.

वैद्यकीय उपचासाठी मदत मिळावी, याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.काय असणार कक्षाची जबाबदारी:- अर्ज करण्यासाठी रूग्ण व नातेवाईकांना मदत करणे.- प्राप्त अर्जांची सद्यस्थिती उपलब्ध करुन देणे.- रूग्ण व नातेवाईकांच्या समस्यांचे निराकरण करणे.- आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे.

– नागरिकांमध्ये कक्षा बाबत जनजागृती आणि प्रसिध्दी करणे.- कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरिता आजारांचे पुनर्विलोकन करणे.- जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेटी देणे.- मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अधिकाधिक देणग्यांचा ओघ येण्याकरिता प्रयत्न करणे.- अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे.रूग्ण व नातेवाईकांना होणार कक्षाचे फायदे:- रूग्ण व नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला अर्ज करण्याकरिता मदत मिळणार.- अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी, माहिती सहज उपलब्ध होणार.- संलग्न असणाऱ्या रूग्णालयांची यादी मिळणार.- अर्ज किंवा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज भासणार नाही.- अर्जाची स्थिती जिल्हाधिकारी कार्यालयात समजणारअधिक माहितीसाठी आपण https://cmrf.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देवू शकता.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन आज 1 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनशिनगारे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, प्र. उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) सचिन चौधर, तहसिलदार (महसूल) रेवण लेंभे, तहसिलदार उमेश पाटील, प्रदीप कुडाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

मनोज सुमन शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,ठाणे

संबंधित पोस्ट

शेतीच्या व्यवहरातुन फसवणूक केल्या प्रकरणाी तालुका पोलीस स्टेशन येथे 420 चा गुन्हा दाखल

जिल्ह्यात २० व २१ मार्चला “ग्रंथोत्सव २०२४” होणार साजरा

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आठव्या हप्त्यापोटी एकूण ८९,७५,२९८ शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण १७९८.७८ कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

सुशिक्षित बेरोजगारांनी आपली उमेदवार नाव नोंदणी मधील माहिती अद्यावत करावी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची घेतली भेट* 

नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ जालना शहरात भव्य महिला रॅली,महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – शुभांगी देशपांडे