vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांनावीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार  – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांनावीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार  – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या संयुक्त शेतीधारक शेतकऱ्यांना वीजपुरवठा होण्यासाठी कमी मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील, यासाठी महाजनको व संबंधित शासकीय उपक्रमांकडून प्रस्ताव मागवून कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या विविध विषयांशी संबंधित बैठक झाली. यावेळी महसूल राज्यमंत्री योगेश कदम, विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, महाजनकोचे अध्यक्ष बी. राधाकृष्णन, महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख, शेती महामंडळ, ऊर्जा व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेती महामंडळाच्या जमिनी करार पद्धतीने शेती शेतकऱ्यांना देण्यात आल्या असून त्या ठिकाणी महावितरणकडून वीज पुरवठा केल्यास जास्त खर्च येऊ शकतो असे निदर्शनात आले आहे. या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतून वीज उपलब्ध करुन देण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील. यासाठी ही योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.बावनकुळे यांनी सांगितले.

राज्य शेती महामंडळाच्या जमिनी संयुक्त शेतीसाठी विविध ठिकाणी देण्यात आल्या आहेत. यासह महामंडळाच्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प आणि सोलार पार्क निर्मितीसाठी देखील जागा निश्चित केली जावी, अशा सूचना महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिल्या.

0000

संबंधित पोस्ट

चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : लाभार्थ्यांना धनादेश व दाखल्यांचे वितरण

संजय गांधी विभागातील आयटी असिस्टंटच्या मानधन वाढीबद्दल पालकमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद

56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा इफ्फी 2025 मध्ये प्रतिष्ठित ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कारासाठी पंधरा चित्रपट स्पर्धेच्या रिंगणात

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागाने सातत्याने राबविलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट…

vishwatmaklokswamivarta

सत्यमेव जयते फार्मर कपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta