vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

संजय गांधी विभागातील आयटी असिस्टंटच्या मानधन वाढीबद्दल पालकमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद

संजय गांधी विभागातील आयटी असिस्टंटच्या मानधन वाढीबद्दल पालकमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी विभागात कार्यरत 419 आयटी असिस्टंटच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी आयटी असिस्टंट कर्मचारी संघटनेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले की, 2014 पासून हे कर्मचारी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांमध्य संगणकीय तांत्रिक कार्य पार पाडत आहेत. अत्यल्प मानधन असूनही ते लाभार्थीची माहिती अद्ययावत करणे, डीबीटी पोर्टल, एनसएपी व पीफएमस प्रणालीद्वारे पेंशन वितरण यासारखी महत्त्वाची कामे करत आहेत. मात्र गेल्या दहा वर्षांपासून मानधनात वाढ झालेली नाही. त्यामुळे सेवेला स्थैर्य, शासनमान्य वेतनश्रेणी, वार्षिक वेतनवाढ, सेवा सुरक्षा, भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय सुविधांचा समावेश, मानधन थेट शासन स्तरावरून वितरित करावे. असे निवदेन महाराष्ट्र राज्य कंत्राटी आय.टी.असिस्टंट कर्मचारी संघटनेतर्फे अनिल उबाळे, किरणराज पंडित, ज्योती जाधव, योगिता चव्हाण, सीमा शरणागत, कृष्णा पवार, आमेर शेख, करण सोनवणे, पोपट जामकर, आसिफ पठाण यांनी निवेदनाद्वारे करण्यात आली.

 

00000

संबंधित पोस्ट

पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे साजरा करण्यात आला ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा

vishwatmaklokswamivarta

लखनऊच्या CCS आंतरराष्ट्रीय विमानतळावर DRIने १५.४६ कोटींचं हाय-ग्रेड हायड्रोपोनिक गांजा (१५.४६ किलो) जप्त  बँकॉकहून आलेल्या दोन भारतीय प्रवाशांकडून व्हॅक्युम-पॅकिंगमध्ये लपवलेला गांजा सापडला. पुढील तपास सुरू आहे.

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

ठाण्याचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण ठरेल-आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

vishwatmaklokswamivarta

नागरिकांना जलद सेवा पोहोचवण्यासाठी शासकीय सेवा ऑनलाईन देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करा-महा आयटी कॉर्पोरेशन मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर

गुटखा आणि प्रतिबंधितपदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे होणार निलंबन..

vishwatmaklokswamivarta