vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे साजरा करण्यात आला ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा

पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे साजरा करण्यात आला ७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा

राज्य प्रतिनिधी-

पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे गडचिरोली जिल्हयाचे सह पालकमंत्री मा. अड. श्री. आशिष जयस्वाल यांचे हस्ते राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. तर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

या प्रसंगी गडचिरोली पोलीस दल व विविध शालेय विद्यार्थांकडून पथसंचलन तसेच चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली व सांस्कृतीक कार्यक्रम पार पडला.

राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार तसेच वेगवर्धित पदोन्नती प्राप्त पोलीस अंमलदार यांना पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान, पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पथसंचलन व चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर.

गेल्या एका वर्षात नव्याने उभारण्यात आलेल्या पोस्टे नेलगुंडा, कवंडे, तुमरकोठी, पोमके फुलणार येथे देखील प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

00000

संबंधित पोस्ट

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची मंत्रालयातील प्रदर्शनास भेट

छावणीमध्ये दाखल जनावरांना चारा, पाणी, पशुखाद्य-देण्यासाठी 30 जून पर्यंत दरपत्रक मागणी

जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा; कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास कडक कारवाई – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा*

इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी

लोकाभिमुख सामाजिक संस्थाचा आधारस्तंभ हरपला लोकमान्य टिळक यांचे पणतू, केसरीचे विश्वस्त डॉ. दीपक टिळक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजलीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण केली

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाबाबतचे प्रश्न सोडविणार – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल