vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुखेड तालुक्यात #भूकंपाचे सौम्य धक्के* *नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* 

*मुखेड तालुक्यात #भूकंपाचे सौम्य धक्के* *नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन*

नांदेड, प्रतिनिधी:- मुखेड तालुक्यातील हिब्बट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, धनज व जामखेड या गावांमधून आज दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 03:25 मी. वाजता #भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली.

त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1520 Hrs. वाजता या धक्क्याची नोंद झाली असून या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.0 एवढी नोंदविण्यात आली असून याचा केंद्रबिंदु नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील खपराळ गावाजवळ असल्याचे कळते. सदर धक्का हा अतिसौम्य प्रकारचा आहे तसेच या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याबाबत तहसीलदार #मुखेड यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे.

तरी नागरिकांनी घाबरून न जाता #सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरित दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्ट ने फिट करून घ्यावीत. पुन्हा असा आवाज आलाच तर पटकन घराबाहेर मोकळ्या जागेत गोळा व्हावे व प्रशासनाला (02462) 235077 या क्रमांकावर संपर्क करून कळवावे तसेच कोणत्याही अफवांनावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जनतेला केले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र आता थांबणार नाही…! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालानुसार महाराष्ट्र सर्वच आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर; दिमाखदार वाटचालीसाठी नागरिकांचे अभिनंदन

अकोल्याचे ३० बालवैज्ञानिक विद्यार्थी निघाले इस्त्रो वारीला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दाखवली हिरवी झेंडी..

vishwatmaklokswamivarta

सीएनजी दुर्घटना नियंत्रणासाठी विविध यंत्रणांची संयुक्त रंगीत तालीम• लातूरमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रभावी सादरीकरण..

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीच्या काही मतदारसंघातील सार्वजनिक सुट्टी रद्द

vishwatmaklokswamivarta

डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रांचे लवकरच मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हस्ते उद्घाटन..

भारतीय सशस्त्र दलातील अधिकारी पदांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना सुवर्णसंधी