vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

१८ ऑक्टोबर रोजी परिवर्तनवादी साहित्य संमेलन: साहित्यिक, विचारवंत, कवी आणि कलावंतांची मांदियाळी*डॉ. श्रीपाल सबनीस संमेलनाध्यक्ष;* *सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या होणार हस्ते उद्घाटन*

१८ ऑक्टोबर रोजी परिवर्तनवादी साहित्य संमेलन: साहित्यिक, विचारवंत, कवी आणि कलावंतांची मांदियाळी*डॉ. श्रीपाल सबनीस संमेलनाध्यक्ष;* *सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या होणार हस्ते उद्घाटन*

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित पहिल्या राज्यस्तरीय परिवर्तनवादी साहित्य संमेलनाचे आयोजन रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी तापडिया नाट्यमंदिर, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस हे संमेलनाध्यक्ष असून, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्योजक अॅड. रामेश्वर तायडे हे स्वागताध्यक्ष आहेत. साहित्य, सामाजिक परिवर्तन, लोकशाही, संविधान, काव्य आणि प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी या संमेलनातून साहित्यप्रेमींना अनुभवता येणार आहे.

 

संमेलनाची सुरुवात सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या औरंगपुरा येथील पुतळ्यापासून ग्रंथदिंडीला प्रारंभ होऊन ती तापडिया नाट्यमंदिरातील महात्मा जोतीबा फुलेs साहित्यनगरीत पोहोचेल. या वेळी ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे.

 

*उद्घाटन सत्रात मान्यवरांची उपस्थिती*

सकाळी १० वाजता उद्घाटन सत्र होणार आहे. या सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, उद्घाटक संजय शिरसाट आणि स्वागताध्यक्ष अॅड. रामेश्वर तायडे यांच्यासह अॅड. धनंजय बोरडे, नाट्यकलावंत प्रदीप आडगावकर, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के, मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे, अधीक्षक अभियंता एस. एस. भगत, मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे, कवी व सामाजिक कार्यकर्ते इंजि. राजधर दांडगे आणि उद्योजक चेतन राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शिवाजी वाठोरे हे संमेलनाची भूमिका मांडतील. तर रतनकुमार साळवे प्रास्ताविक करतील, प्रवीणा कन्नडकर सूत्रसंचालन करतील, तर डॉ. धनराज गोंडाणे आभार मानतील.

 

*लोकशाहीसमोरील आव्हानांवर परिसंवाद*

दुपारी २ वाजता ‘लोकशाहीसमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाय’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. साहित्यिक व समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे हे परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषवतील. ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर, व्याख्याते प्रा. सुधीर अनवले आणि सुप्रसिद्ध व्याख्यात्या मनीषा तोकले हे सहभागी होणार आहेत. श्रावण कोळनूरकर सूत्रसंचालन करतील, तर रत्नाकर खंडागळे आभार मानतील. दुपारी १ ते २ या वेळेत भोजनावकाश असेल.

 

 *राज्यभरातील कवींचा सहभाग*

दुपारी ४.३० वाजता कवी संमेलन होणार असून, सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत (अकोला) अध्यक्षस्थान भूषवतील.  यांच्या उपस्थितीत राज्यातील विविध भागांतील कवी आपल्या कविता सादर करतील. या कवी संमेलनाला डी. बी. जगत्पुरिया, डॉ. धोंडोपंत मानवतकर आणि सुरेश साबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.कवियित्री ललिता सबनीस, संदेश कर्डक, धनंजय गव्हाळे, डॉ. यशवंत खडसे, पुष्पा साळवे, सुनील गायकवाड, हृदयमानव अशोक, वैभव काळखैर, डॉ. प्रभाकर शेळके, वैशाली खंडारे, डॉ. मधुकर दिवेकर, संजय घाडगे, सुनीता तागवान, देविदास अंभोरे, हबीब भंडारे, सुनील उबाळे, विजय मोकळे, योगिता सोनवणे आणि अनिल मनोहर हे कवी सहभागी होणार आहेत. धम्मपाल जाधव व पंकज शिंदे सूत्रसंचालन करतील, तर विवेकानंद सुकाळे आभार मानतील.

 

*समारोप सत्रात ठरावांचे वाचन*सायंकाळी ६.३० वाजता समारोप सत्र होणार असून, डॉ. श्रीपाल सबनीस अध्यक्षस्थान भूषवतील. या सत्रात रवींद्र बोर्डे, शिक्षणमहर्षी मधुकर भोळे, के. ई. हरिदास आणि कथाकार प्रा. छबुराव भांडवलकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संमेलनातीलf ठरावांचे वाचन ज्येष्ठ साहित्यिक भीमराव सरवदे करतील. उज्ज्वलकुमार म्हस्के सूत्रसंचालन करतील, तर राहुल साळवे आभार मानतील.*शाहिरी जलसा आणि प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम*

सायंकाळी ७.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत शाहिरी जलसा सादर होणार आहे. भीमशाहीर नागसेनदादा सावदेकर, मेघानंद जाधव, कुणाल वराळे, अजय देहाडे, स्नेहल कीर्तने, चेतन चोपडे आणि संघपाल गवई यांचा सहभाग असेल. मीरा उमप भारूड, तर वसुधा कल्याणकर पोवाडा सादर करतील. प्रा. शैलजा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली देवगिरी महाविद्यालयाचे विद्यार्थी, आंबेडकरी जलसा, मराठी लावणी आणि प्रबोधनात्मक लोकगीतांचे कार्यक्रम सादर करणार आहे. भीमशाहीर अरुण खरात सूत्रसंचालन करतील. धम्मप्रिया खरात, कांचनताई सदाशिवे, सुषमा गायकवाड, विद्या साळवे, गंगाताई सुरडकर ह्या महिला सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.*साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार*या संमेलनाच्या मुख्य संयोजन समितीत प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रा. शिवाजी वाठोरे, प्राचार्य प्रमोद हेरोडे, इंजि. राजधर दांडगे, भीमराव सरवदे, अॅड. डी. व्ही. खिल्लारे, प्रा. डॉ. प्रज्ञा साळवे, ज्येष्ठ पत्रकार एस. एस. खंडाळकर, डॉ. धनराज गोंडाणे, प्रकाश त्रिभुवन, प्रा. डॉ. वामन साळवे, अंकुश पंडित, राहुल साळवे, डॉ. यशवंत खडसे, प्रा. डॉ. लहु वाघमारे, डॉ. मधुकर दिवेकर, बाबुराव बनसोडे, श्रावण कोळनूरकर, रतनभाई खंडागळे यांच्यासह अनेक साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते कार्यरत आहेत.याशिवाय विविध क्षेत्रांतील साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक, पत्रकार आणि कार्यकर्त्यांचा समावेश असलेली संयोजन समिती संमेलनाच्या यशस्वितेसाठी प्रयत्नशील आहे.

समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनवादी विचारांची साहित्यिक अभिव्यक्ती यांना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात साहित्यिक,t कवी, विचारवंत, कलावंत आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संमेलनाचे मुख्य आयोजक तथा दैनिक ‘निळे प्रतीक’चे संपादक रतनकुमार साळवे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहयोगाने नवी मुंबईतील गावठाण क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहीम**श्रीसदस्यांसह नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांना सेवाभावी आदरांजली*

आरोग्य शिक्षणासाठी प्रभावी माहिती, शिक्षण व संवाद यंत्रणा अधिक सक्षम करा– आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

दिल्लीतमहिलासाहित्यसंमेलन ; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल ..

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी पदासाठी पूर्वप्रशिक्षणाची संधी,पूर्वतयारीसाठी २५ एप्रिल रोजी मुलाखतीस उपस्थित राहण्याचे आवाहन

संकटात महिलांना सावरणारं ‘ #सखीवनस्टॉपसेंटर ’पीडित व गरजू महिलांना देत आहे आधार; तात्पुरत्या निवाऱ्याचीही सुविधा.

जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल खुल्या विक्रीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई