vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

राज्यात अंगणवाडी सेविका 1,08,627 आणि मदतनीस 1,05,470 आहेत. अशी एकूण २,१४,०९७ पदे कार्यरत आहेत. या सर्व कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सां सांगितले आहे

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज

-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

संबंधित पोस्ट

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव यांनी सपत्नीक दर्शन घेतले

पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जतच्या वैभवात भर पडेल- ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे- जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रलंबित प्रतिवेदन/ई-चालन संदर्भात लोकअदालत 

बा.. विठ्ठला भरपूर पाऊस पडू दे.. व आवर्षणाचे संकट दूर कर..! माजीनगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांचे विठूरायाला साकडे

करवीर हायकर्स’ च्या सातजणांची तिरंगा फडकवून,संविधान उद्देशिका प्रदर्शनाने एवरेस्ट बेस कँप’ यशस्वी… 

vishwatmaklokswamivarta

रक्षाबंधनासाठी भारतीय टपाल विभागाचे ‘वन स्टॉप राखी सोल्युशन’;बुलढाणा विभागातील सर्व टपाल कार्यालयांत विशेष राखी लिफाफे उपलब्ध..