vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सैन्य भरतीःऑनलाइन अर्ज मागविले

सैन्य भरतीःऑनलाइन अर्ज मागविले

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- भारतीय सैन्यभरतीसाठी ऑनलाइन सामान्य प्रवेश परीक्षा (CEE) वर्ष २०२५-२६करीत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. १२ मार्च ते १० एप्रिल दरम्यान आपले अर्ज दाखल करावे. ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार आहे.

    पहिला टप्पा- संगणक आधारित लेखी परीक्षा (CEE) निश्चित CBT केंद्रांवर घेतली जाईल. अग्निवीर लिपिक/ SKT पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टायपिंग चाचणी द्यावी लागेल.

दुसरा टप्पा- CEE उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि शारीरिक मापन चाचणी भरती मेळाव्यादरम्यान घेतली जाईल.

तिसरा टप्पा- भरती मेळावा सैन्य भरती कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित ठिकाणी आयोजित केला जाईल. त्याआधी उमेदवारांची अनुकूलता चाचणी (Adaptability Test) आणि वैद्यकीय चाचणी होईल. उमेदवारांनी चाचणीसाठी योग्य बॅटरी बॅकअप आणि 2GB डेटा असलेला स्मार्टफोन बरोबर आणावा.

अग्निवीर उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार कोणत्याही दोन गटांसाठी अर्ज करता येईल. मात्र, त्यांना प्रत्येक गटासाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागेल आणि स्वतंत्र प्रवेश परीक्षेला सामोरे जावे लागेल. तथापि, भरती मेळावा व वैद्यकीय चाचणी फक्त एकदाच दिली जाईल.खेळाडूंना, NCC प्रमाणपत्रधारकांना, ITI आणि डिप्लोमा धारकांना विशेष गुण देण्यात येणार आहेत.

नोंदणी, परीक्षेची प्रक्रिया आणि सराव चाचणी याबाबत माहिती देणारे व्हिडिओ भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

सर्व इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in संकेतस्थळाला भेट द्यावी. उमेदवारांनी कोणत्याही दलाल किंवा फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नये,असे भरती संचालक अनुज सिंघल यांनी कळविले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

पलूस महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी एक हजार पंधरा तरुणांनी उभारले स्वतःचे उद्योग…

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जयकिसन शिंदे ठरले ‘कृषिभूषण’, सोमीनाथअवघड यांना ‘युवा शेतकरी पुरस्कार’; जालना जिल्ह्याचा मुंबईत दणदणीत गौरव

ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे,महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन उत्साहात संपन्न

रस्त्यावरील खडयामुळे अपघाताने मृत्यु झाल्यास आता कुटुंबाला 6लाख रुपये मिळणार-प्रा.डॉ.जयपाल पाटील

vishwatmaklokswamivarta

भिलवडी स्टेशन ते नांद्रे स्टेशन दरम्यानचा रस्ता15 ते 18 फेब्रुवारी कालावधीसाठी बंद.

vishwatmaklokswamivarta