vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी एक हजार पंधरा तरुणांनी उभारले स्वतःचे उद्योग…

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी एक हजार पंधरा तरुणांनी उभारले स्वतःचे उद्योग…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – जिल्ह्यातील 1 हजार 15 तरुणांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) अंतर्गत स्वतःचे उद्योग उभारून नवा आदर्श निर्माण केला आहे. या योजनेतून मिळालेल्या मदतीचा योग्य उपयोग करत त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे .जिल्ह्याने 2024-25 या आर्थिक वर्षात 103.36 टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड यांनी दिली.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेद्वारे उत्पादन क्षेत्रातील उद्योजकाला 50 लाख रुपये, तर सेवा क्षेत्रातील उद्योजकाला 20 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. सर्वसाधारण प्रवर्गातील उद्योजकाला कर्ज रकमेच्या 15 ते 25 टक्के, तर विशेष प्रवर्ग, एससी, एसटी, महिला, अपंग, माजी सैनिक, ओबीसी व अल्पसंख्यांकांना 25 ते 35 टक्के अनुदान दिले जाते. जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज सादर केल्यानंतर मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यबल समिती मार्फत कर्ज प्रस्ताव बँकेकडे शिफारस केला जातो. बँकेने मंजूर व वाटप केल्यानंतर उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी अनुदान दिले जाते, कर्ज प्रस्ताव योजनेत राष्ट्रीयकृत बँकाचा सहभागानुसार राष्ट्रीयीकृत सीएमईजीपीमध्ये बँकांच्या शाखा 218, जिल्ह्यात मंजूर केली आहेत 588, सीएमईजीपीत खासगी बँकांच्या शाखा 79 जिल्ह्यात मंजूर केली आहेत .यात 247 कर्जाची प्रकरणे करण्यात आली.

जिल्ह्यातील तालुकानिहाय लाभार्थी संख्या व उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत.छत्रपती संभाजीनगर उद्दिष्ट 574 लाभार्थी संख्या 599, ता.गंगापूर उद्दिष्ट 98 लाभार्थी संख्या 95, ता. वैजापूर उद्दिष्ट 48 लाभार्थी संख्या 62, ता. खुलताबाद उद्दिष्ट 28 लाभार्थी संख्या -26, ता.कन्नड उद्दिष्ट 51 लाभार्थी संख्या 47, ता.सिल्लोड उद्दिष्ट 54 लाभार्थी संख्या 64, ता.सोयगाव उद्दिष्ट 22 लाभार्थी संख्या 16,ता.फुलंब्री उदिष्ट 36, लाभार्थी संख्या 37, ता.पैठण उदिष्ट 71 , लाभार्थी संख्या 69 जिल्ह्यातील एकूण उद्दिष्टे 982 लाभार्थी संख्या 1015 जिल्ह्यातील टक्केवारी 103.36 आहे.

00000

संबंधित पोस्ट

सी.एल.एम.सी मिल्क बँकेचा शुभारंभ सातारा जिल्हा रुग्णालयाचा नाविण्यपुर्ण उपक्रम

vishwatmaklokswamivarta

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सोमवारीअमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली

स्वतः डिजिटल व्हा आणि घरच्यांना डिजिटल साक्षरतेचे धडे द्या : राहुल पाटील#राष्ट्रीयग्राहकदिन जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा

चिखलदरा महोत्सवात महिला बचतगट प्रदर्शन, विक्री केंद्र स्थापन करून व्यापकता निर्माण कराव-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*सायन्स कोर मैदान येथे विभागीय मिनी सरस वैदर्भीय महोत्सव जिल्हा प्रदर्शन व विक्री – 2026

राज्य लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी   – आयुक्त डॉ. किरण जाधव…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; देशभरातील 48 शिक्षकांची निवड  महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश…