vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे उप वनसंरक्षक राहुल पाटील यांचे आवाहन

पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे उप वनसंरक्षक राहुल पाटील यांचे आवाहन

 

रायगड प्रतिनिधी-कोकणामध्ये होळी या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या काळात होळीसाठी वृक्ष तोड न करता केरकचरा, सुका पाळापोचाळा जाळून होळी साजरी करावी. कोणतीही वृक्षतोड करु नये तसेच कोणत्याही प्रकारे वन्यप्राण्याची शिकार करु नये. तसेच पर्यावरणपुरक होळी साजरी करावी,असे आवाहन उपवनसंरक्षक रायगड अलिबाग राहुल पाटील यांनी आवाहन केले आहे.

वृक्षाचे घनदाट जंगल असलेल्या शहराचे स्वरुप आजघडीला काँक्रिटीकरणाचे जंगल असेच काहीसे झाले आहे. शहराच्या वाढत्या व्याप्तीमुळे सर्रासपणे वृक्षतोड केली जात असून यामुळे पर्यावरणाला मात्र मोठ्या प्रमाणावर धोका पोहोचत आहे.

भारतीय वन अधिनियम, 1975 च्या तरतुदीनुसार पूर्वपरवानगिशिवाय कोणतेही झाड तोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्षात अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. अवैधरित्या वृक्षतोड केल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी 1000 ते 5000 रुपये दंड, तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, तोंडावर येऊन ठेपलेल्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर होळी जाळण्यासाठी लाकूड हवे म्हणून ठिकठिकाणी सर्रासपणे वृक्षतोड केली जात असते. तसेच प्रामुख्याने सावर जातीचे वृक्षांची अवैधपणे वृक्षतोड केली जाते.

यासाठी एकीकडे वनविभाग, प्रशासन तसेच विविध विभागाद्वारे वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न केले जात असताना, दुसरीकडे मात्र अनधिकृतपणे होणाऱ्या या वृक्षतोडीकडे होणारे दुर्लक्ष पर्यावरणाला अत्यंत मारक ठरणारे आहेत. तसेच अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळून अनेक प्रकारे नैसर्गिक आपत्ती येत आहे व त्यामुळे आपले सर्वांचेच नुकसान होत आहे.  तसेच होळीत अनेक ठिकाणी गोवऱ्या, लाकडे जाळली जातात. या प्रकारामुळे प्रदूषणातही भर पडते. परिणामी, पर्यावरणालाही धोका पोहोचतो. धार्मिक महत्व असल्याने याबाबतही नागरिकांमध्ये प्रबोधन होण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध मंडळांनी एकत्र येऊन सार्वजनिकरित्या एकाच ठिकाणी होळी करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘पत्रकार संवादिका’ पुस्तिका, घडीपत्रिकेचे प्रकाशन

अध्यात्मिक संस्कृतीचा पाया सेवाभाव हे प्रमाण मानून शासन कार्यरत–पंतप्रधान नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

मराठीच्या अभिजात दर्जानंतर विकासकामांना गती– मंत्री उदय सामंत केंद्राच्या निधीची प्रतीक्षा न करता राज्याच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू

पायभूत सुविधा निर्मितीतून लातूर पोलीस दल आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले• लातूर सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण• नवनियुक्त ४६ पोलीस कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप• क्यूआर कोड आधारित पेट्रोलिंग यंत्रणेचा शुभारंभ

वर्धा शहरालगत असलेल्या रोठा परिसरात एका बारा वर्षाच्या बालिकेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा संशय तीन आरोपी अटक .

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासात सर्वांचा सहभाग आवश्यक – पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हा नियोजन समितीची