vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विविध कृषी पुरस्कार सन-2023 करिताशेतकरी, गट, संस्था, व्यक्तींनी प्रस्ताव सादर करावेत..

विविध कृषी पुरस्कार सन-2023 करिताशेतकरी, गट, संस्था, व्यक्तींनी प्रस्ताव सादर करावेत..

 

रायगड प्रतिनिधी- महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सन-2023 या वर्षांमध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्थाकडून विविध कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकरी, गट, संस्था, व्यक्तींनी विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड-अलिबाग वंदना शिंदे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरीता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, सेंद्रीय शेती कृषीभूषण पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव तयार करण्याकामी अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृष अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

0000000

संबंधित पोस्ट

शिवद्रोही प्रशांत कोरटकरला अटक कराअन्यथा राज्याभरात तीव्र आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रेमी संघटनांचे धरणे आंदोलन

बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६-निवडणूक नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांना निवडणूक कामकाजासंदर्भात मार्गदर्शन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे बजवावी -उत्तम दिघे

सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस मान्यताØ आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभेØ मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज,कडक अंमलबजावणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

विधानसभा लक्षवेधी सूचना :ड्रग्ज प्रकरणात दोषी पोलिसांना बडतर्फ करणार- गृह राज्यमंत्री योगेश कदम