vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासन बळीराजाच्या खंबीरपणे पाठीशी – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मालेगाव तालुक्यातील अमानी येथील शेतकऱ्यांशी संवाद

शासन बळीराजाच्या खंबीरपणे पाठीशी – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे मालेगाव तालुक्यातील अमानी येथील शेतकऱ्यांशी संवाद…

वाशिम, प्रतिनिधी: गेल्या चार महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मालेगाव तालुक्यातील अमानी परिसरातील अतिवृष्टीग्रस्त शेतपरिसराची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला

पाहणीवेळी आमदार अमित झनक, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, महसूल उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, कृषी विकास अधिकारी अभिजित देवगीरकर, तालुका कृषी अधिकारी कैलास देवकर, अतुल जावळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री भरणे म्हणाले की, गेल्या चार महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नैसर्गिक संकटाला धैर्याने सामोरे जाताना शासन ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे.पुढे म्हणाले की, जिल्ह्यात तब्बल २ लाख १० हजार शेतकऱ्यांचे सुमारे ४ लाख ३७ हजार ६१९ एकर पिकांचे नुकसान झाले आहे. शासन नियमाप्रमाणे १५१ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.त्याशिवाय पशुधनाची हानी झाली असून अनेक घरांची पडझड झाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. शासनाच्या वतीने प्रत्येक बाधित कुटुंबाला मदत दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. भरणे म्हणाले की, मे-जून महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. आता जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीबाबतची भरपाईदेखील लवकरच वितरित केली जाणार आहे.शेतकऱ्यांनी समोर मांडलेल्या समस्या ऐकून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या काळात सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले , महसूल ,कृषी तसेच आपत्ती व्यवस्थापन निधीच्या माध्यमातून दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासोबतच भविष्यात अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या परिणामांना तोंड देण्यासाठी शाश्वत उपाययोजना करण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार- मंत्री उदय सामंत

एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांनी अमला वायू दल स्थानकाच्या कर्मचारी आणि कुटुंबासह साजरी केली दिवाळी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे ७५० कोटी रुपयांचे विविध कालावधीचे कर्ज रोखे विक्रीस

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृहपरिसरात मिरवणूका काढणे, घोषणा देण्यास निर्बंध…

vishwatmaklokswamivarta

मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा उपनगरी रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या रेल्वे प्रवाशांची उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली.

आज पाचवा दिवस पाचव्या दिवसाचे श्रीगणेश मूर्ती विसर्जन 🌸