vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

रोटी क्लब मुंबई डिस्टिक 31 41 आयोजित आनंदोत्सवामुळे ज्येष्ठांकडून जाहीर आभार

 रोटी क्लब मुंबई डिस्टिक 31 41 आयोजित आनंदोत्सवामुळे ज्येष्ठांकडून जाहीर आभार

मुंबई प्रतिनिधी-

[मुंबई बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स , रोटरी क्लब येथे डॉक्टर डे निमित्त ज्येष्ठ नागरिकां चे मनोरंजन व्हावे व आशीर्वाद प्राप्त व्हावे याकरिता सायंकाळी ६ते८ या वेळात स्थळ बालगंधर्व नाट्यगृह बांद्रा येथे रोटरी क्लब मुंबई डिस्ट्रिक्ट 31 41 च्या वतीने जेष्ठांकरिता संगीतमय आनंद उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम मुंबई बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स चे प्रेसिडेंट सुयोग गंगावणे आणि सेक्रेटरी मोहन वैद्य यांच्या विशेष प्रोत्साहनाने पार पडला . नामांकित खाजगी व सरकारी रुग्णालयातील तज्ञ अनुभवी स्पेशलिस्ट अशा समूहातील डॉक्टरांनी स्टेजवर विविध प्रकार च्या जुन्या गाण्याचा खजिनाच सादर केला. विविध वाद्य समूहाच्या साथीने गाताना अनुभवता आले. या गाण्यातून जेष्ठांची करमणूक झालीच पण मध्ये मध्ये विविध आजारांबद्दल सूत्रसंचालकामार्फत प्रश्न विचारून त्यावर डॉक्टरांचे सल्ले ही जेष्ठांना ऐकावयास मिळाले सदर कार्यक्रमा ची कल्पना डॉक्टर मनोज मोटवानी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांची होती चीफ गेस्ट म्हणून जुही बब्बरसोनी यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती . सर्व ज्येष्ठ मंडळींनी सभागृह भरले होते त्यातूनही संगीतमय गाणे नाच नृत्यकला यामुळे ज्येष्ठांचा आनंद द्विगुणीत झाला होता सायंकाळी प्रवेश करतेवेळी सर्व ज्येष्ठांना अल्पोपहार देऊन सन्मानपूर्वक सभागृहात सोडले जात होते या कार्यक्रमाच्या प्रत्यक्षदर्शी अनुभव व आनंदात सहभागी होणाऱ्या मध्ये बांद्रा पूर्व येथील अरुणोदय वॉकर्स असोसिएशन तर्फे श्रीमती अंजली रिसबुड श्री किरण भोगले आणि श्री दिलीप गाडेकर हॅपिनेस ज्येष्ठ नागरिक संघ धारावी, आणि अन्य सभासद यांच्याकडून रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 31 41 चेआभार मानायला हवे यातूनच आयोजक मंडळींना ज्येष्ठांचे आशीर्वाद प्राप्त झाले आहेत अशी आम्हास वाटते यापुढेही रोटरी क्लब मुंबईने पुढाकार घेऊन ज्येष्ठ करिता समाजाचे दुर्बल घटकांकरिता असेच कार्य सुरू ठेवावे ही अपेक्षा पोलीस ऑफीसर पद्मावती यांनीही जेष्ठ लोकांनी काय काळजी घ्यावी फोन द्वारा त्यांच्या लुटीचे कसे प्रकार होतात याविषयी विशेष माहिती .अंजली रिसबुड किरण भोगले दिलीप गाडेकर यांनी सांगितले

संबंधित पोस्ट

जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग येथे ई-सेवा व नक्कल कॉपी केंद्राचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून दिंडोरीच्या घटनास्थळाची पाहणी

vishwatmaklokswamivarta

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवाने आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

एन्व्हायरोटेक एशिया 2026′ परिषदेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे जल व्यवस्थापनावर प्रभावी सादरीकरण…

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी कॉर्पस निधीची तरतूद करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ पर्यंत वाढविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta