vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

१० जुलै’ला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर 

१० जुलै’ला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

मुंबई  (प्रतिनिधी): पत्रकार हे समाजाचे चतुर्थ स्तंभ मानले जातात. दिवसरात्र मेहनत करून समाजासाठी माहितीचे दालन खुले ठेवणाऱ्या या योद्ध्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी आहे, याच भावनेतून अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन व रोटरी क्लब नॉर्थ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमाने एक विधायक पाऊल उचलण्यात आले आहे.गुरुवार, १० जुलै २०२५, रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदानाजवळ येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात हृदय व रक्तदाब तपासणी , मधुमेह (शुगर) तपासणी ,रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी ,संपूर्ण वैद्यकीय तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचा वैयक्तिक सल्ला, तपासणीनंतर मोफत औषध वाटप इत्यादी सेवा निःशुल्क  दिल्या जाणार आहेत.

या शिबिरात वोखार्ड हॉस्पीटल या वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर व तज्ज्ञांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या उपक्रमामागे पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य सुरळीत राहावे, हीच भावना आहे.”आरोग्य हेच खरे धन आहे.” या उक्तीला अनुसरून या संधीचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन अखिल महाराष्ट्र राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण

कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत पाणी उपसा बंदी

मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस मध्ये बौद्ध भंते विमान्सा यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र* *निषेध ~ राज्यमंत्री रामदास आठवले* 

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात २३ नोव्हेंबर २०२५(रविवार)रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चे आयोजन१७,०३३ उमेदवार देणार परीक्षा

vishwatmaklokswamivarta

SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; 1.91 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, 88 हजार 490 मृत मतदारांची नोंद

vishwatmaklokswamivarta

संभाजी नगर प्रभाग क्रं.1 मधील रोडचे काम न करता कॉन्ट्रक्टरने उचले बिल-जिल्हाधिकारीकडे चौकशीची मागणी – डॉ.रामकृष्ण भोडोंने