vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ नागरिकांची एनडीआरएफ कडून यशस्वी सुटका

अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ नागरिकांची एनडीआरएफ कडून यशस्वी सुटका

अहिल्यानगर, प्रतिनिधी– अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीचा तातडीने सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे येथील पथकास कर्जत तालुक्यातील मलठण खताळ वस्ती परिसरात तैनात करण्यात आले होते. या पथकाने आज राबविलेल्या मोहिमेत पुरात अडकलेल्या ४४ नागरिकांची सुरक्षित सुटका केली.

कमांडंट संतोष बहादूर सिंह यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने परिसरात पाणी व चिखलमय स्थिती तसेच ऊसशेतीमुळे बोटसह बोटीवरील बाह्य इंजिन वापरणे अशक्य असल्याने दोरीच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. या कारवाईत सर्व नागरिकांची सुरक्षिततेने सुटका करण्यात आली.

स्थानिक प्रशासन, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (SDMA), भारतीय हवामान विभाग (IMD) व धरण प्राधिकरणाशी समन्वय साधून NDRF पुणे पथक सातत्याने कार्यरत आहे. नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी व आपत्ती व्यवस्थापनासाठी पुणे तुकडी सदैव सज्ज असल्याचे एनडीआरएफ कडून कळविण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रंगीत तालीम

vishwatmaklokswamivarta

इंडियाज टॅलेंट फायटसाठी जालन्यातील अवेश हमीद खान यांची निवड

देशाचा श्वास थांबला; हेलिकॉप्टर दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख, सीडीएस बिपीन रावत यांचा मृत्यू……

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना विविध लाभ देण्यासाठीकृषी विभागामार्फत्‍ विशेष मोहीम…

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी कतार दौऱ्यावर, भारतीय समुदायाच्या सदस्यांकडून जोरदार स्वागत

vishwatmaklokswamivarta

भारताच्या इनोव्हेशन इंडेक्स 2021 मध्ये स्थान मिळविणाऱ्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश

vishwatmaklokswamivarta