vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रोहा येथील शिवसृष्टीचे मंत्री कु. अदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

रोहा येथील शिवसृष्टीचे मंत्री कु. अदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

रायगड ( प्रतिनिधी-रोहा-अष्टमी नगर परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची आठवण करून देणाऱ्या ‘शिवसृष्टी’ या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

या शिवसृष्टीमध्ये स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या असून, त्यातून महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि धैर्याचे दर्शन घडते. “हे किल्ले केवळ स्थापत्य नव्हे, तर स्वाभिमान, स्वतंत्रता आणि मराठी अस्मितेचे प्रतीक आहेत,” असे प्रतिपादन कु. तटकरे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, नगरपरिषद मुख्याधिकारी अजयकुमार एडके, तसेच संतोष पोटफोडे, मधुकर पाटील, समीर शेडगे, विनोद पाशीलकर, सुरेश मगर, महेश कोलटकर आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसृष्टीच्या माध्यमातून नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास कु. तटकरे यांनी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

नवीन 125रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागवल*1 ते 15 ऑगस्ट दरम्यान करता येणार अर्ज

कोल्हापूरात ‘आयटीहब’ उभारण्यासाठी शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्याच्या बदल्यात कृषी विद्यापीठाला जिल्ह्यातील अन्य ठिकाणची ६० ते १०० हेक्टर एकत्रित पर्यायी जागा देण्यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक  

नैसर्गिक संसाधनांवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचाच : पालकमंत्री संजय राठोड

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडामराठी भाषेचे जतन व संवर्धनाची चळवळ-सर्व शासकीय कार्यालयातून उभारावी

vishwatmaklokswamivarta

आरटीई’ प्रवेशासाठी मुदतवाढ; २ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज*

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती