vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विना नंबर टिप्पर आणि अवैध गौणखनिज वाहतुकीवर कडक कारवाई! 5 महिन्यांत 339 विना नंबर टिप्परवर कारवाई, 35 लाखांचा दंड वसूल…

विना नंबर टिप्पर आणि अवैध गौणखनिज वाहतुकीवर कडक कारवाई! 5 महिन्यांत 339 विना नंबर टिप्परवर कारवाई, 35 लाखांचा दंड वसूल…

बुलढाणा, प्रतिनिधी: उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, बुलढाणा अंतर्गत कार्यरत वायुवेग पथकाने जानेवारी ते मे 2025 या पाच महिन्यांच्या कालावधीत बेकायदेशीर खनिज वाहतूक करणाऱ्या आणि विना नंबर प्लेट टिप्पर वाहनांवर धडक कारवाई केली आहे. या कालावधीत एकूण 835 वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील 339 विना नंबर टिप्पर वाहनांवर कारवाई करत 35 लाखावरुन जास्त दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.

महिन्यानुसार तपासणी व कारवाईचा तपशील : जानेवारी महिण्यात 116 वाहनांची तपासणी करुन 40 वाहनावर कारवाईत 4 लक्ष 9 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. फेब्रुवारीमध्ये 189 वाहनांची तपासणी करुन 63 वाहनावर कारवाई करत 8 लक्ष 71 हजार रुपये दंड, मार्चमध्ये 127 वाहनांची तपासणी करुन 36 वाहनावर कारवाई करत 5 लक्ष 87 हजार रुपये दंड, एप्रिलमध्ये 98 वाहनांची तपासणी करुन 25 वाहनावर कारवाई करत 5 लक्ष 68 हजार 500 रुपये दंड, मेमध्ये 305 वाहनांची तपासणी करुन 175 वाहनावर कारवाई करत 10 लक्ष 96 हजार 350 रुपये दंड, असे एकूण पाच महिण्यात 835 वाहनांची तपासणी करुन 339 विना नंबर टिप्पर वाहनांवर 35 लक्ष 31 हजार 850 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

विना परवाना, विना नंबर प्लेट किंवा बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करू नये. असे प्रकार आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी वाहनधारकांना केले आहे. परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की भविष्यात देखील अशा बेकायदेशीर कृत्यांवर लक्ष ठेवून कठोर पावले उचलण्यात येणार आहेत. वाहनधारकांनी नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ आयोजित कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

भंडारदरा शताब्दी महोत्सव पर्यटकांसाठी आकर्षण ठरावा – जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील विधान भवनातील बैठकीत कृती आराखड्याचा आढावा

  वारणा धरणात 12.50 टी.एम.सी. पाणीसाठा

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै

आणीबाणी मानधन योजनेमध्ये सुधारणा* अर्ज करण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

अनाथ मुलींमध्ये रमल्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे,सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत ‘आपुलकीचा संवाद’