vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण मंदिर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

        मुंबई, प्रतिनिधी : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने निमंत्रण देण्यात आले.

यंदाच्या आषाढी एकादशी दिवशी रविवार, दि. ६ जुलै, २०२५ रोजी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्यात येईल. या महापूजेचे निमंत्रण देण्यासाठी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज-औसेकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची वर्षा निवासस्थान येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा मंदिर समितीच्या वतीने विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.

मंदिर समितीमार्फत आषाढी यात्रेच्या नियोजनाची तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन कामाची तसेच विठ्ठल रुक्मिणी मातेचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या टोकन दर्शन प्रणालीची तसेच अन्य व्यवस्थेबाबत माहिती देण्यात आली.

००००

संबंधित पोस्ट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काम सर्व यंत्रणांनी समन्वयाने करावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने दि.7 जानेवारी रोजी महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे आयोजन

धारावी येथील पावसाळ्यात पडलेली झाड अद्याप जैसे थे

vishwatmaklokswamivarta

हाफकीन संस्थेच्या बळकटीकरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधितांची बैठक; खाजगीकरणाचा कोणताही विचार नाही – मंत्री नरहरी झिरवाळ

बस थांब्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, मात्र जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्यासाठी, विना परवानगी आंदोलन किंवा हिंसा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा.