vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सरळ प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचणी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सरळ प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचणी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26

ठाणे, प्रतिनिधी:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा संचालित शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत सन 2025-26 या वर्षाकरिता राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रवेश देण्याचे सूचित करण्यात आले असून हँडबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्यूदो, जिम्नॅस्टिक या खेळांसाठी क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रवेशाकरिता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 या वर्षात विभागीय स्तरावर 26 ते 27 जून 2025 या कालावधीत चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे येथे दि. 24 जून 2025 पर्यंत खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रवेशाकरिता वयोमार्यादा दि.07 जुलै 2006 नंतर जन्मलेले व 08 जुलै 2025 रोजी पर्यंत 19 वर्ष पूर्ण झालेले खेळाडू अर्ज करू शकतात. अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध असून अर्जासोबत खालील कागदपत्रांची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा प्रबोधिनी चाचणी दरम्यान खेळाडूंनी मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

1.जन्म प्रमाणपत्र. 2. आधार कार्ड. व 3. क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र.अधिक माहितीकरिता मनिषा मानकर- ९७६७४९९१६२, श्रद्धा तळेकर-७२०८४५०१८१, समीर सुर्यवंशी- ८९२८९५७९५७ यांचेकडे संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी चाचणीमध्ये सहभाग घ्यावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी; जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा घेतला आढावा.. सिंचन प्रकल्पांची पाहणी करण्यासह संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना.

जागतिक स्कूल हॅालिबॅाल चॅम्पियनशिप; 15 वर्षाआतील मुला-मुलींकरीता निवड चाचणी…

सेपाक टाकरा खेळ जालना जिल्ह्याच्या गावांगावात पोहोचवीणार – मंगलाताई पाटीलजिल्हास्तरीय शालेय सेपाक टाकरा स्पर्धा उत्साहात संपन्न..

महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्ये देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर राष्ट्रकुल संसदीय मंडळ विभाग- ७ ची पणजी वार्षिक परिषद

मिरवणुकांमध्ये प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध..

लातूरमध्ये ७ जून रोजी ‘संडे ऑन सायकल’ मोहिमेचे आयोजन