vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

मुंबई, प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे.युनेस्कोमधील ग्रीसचे राजदूत श्री. जॉर्जिओस कौमुत्साकोस यांनी राजमुद्रेतील शब्दांचा “अतिशय विद्वत्तापूर्ण शब्द” असा उल्लेख केला आहे.

युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांनी ग्रीसचे राजदूत श्री. कौमुत्साकोस यांना शिवछत्रपतींच्या राजमुद्रेचे स्मृतीचिन्ह भेट दिले. त्यावेळी झालेल्या चर्चेत श्री. कौमुत्साकोस यांनी ही प्रतिक्रिया उत्स्फुर्तपणे व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांची योजकता अत्यंत समर्पक असल्याचा उल्लेख त्यांनी केला. राजमुद्रेतील “शहाजींचे पुत्र शिवाजी (महाराज) यांच्या या मुद्रेचा महिमा चंद्राच्या कलांप्रमाणे वाढत राहील. जग त्याचा सन्मान करेल आणि ते केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.” या ओळीतील प्रत्येक शब्दांचा अर्थही त्यांनी समजून घेतला आणि राजमुद्रेतील शब्द खरे ठरत आहेत, असेही नमूद केले.

0000

संबंधित पोस्ट

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण· मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ‘आर्थिक आधार’…

vishwatmaklokswamivarta

ओढे-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे अतिवृष्टी उपाययोजनांवर पालकमंत्र्यांची तातडीची बैठक

vishwatmaklokswamivarta

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना राज्य निधीच्या गैरवापराच्या आरोपाखाली अटक

vishwatmaklokswamivarta

परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

टीबी मुक्त भारत’ अभियान झोपडपट्ट्यांपर्यंत नेण्याचा राज्यपालांचा संकल्प

वेदांमध्ये समृद्ध जीवनपद्धती सांगणारे ज्ञान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर वेद पाठशाळे’चे उद्घाटन