vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र आता थांबणार नाही…! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालानुसार महाराष्ट्र सर्वच आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर; दिमाखदार वाटचालीसाठी नागरिकांचे अभिनंदन

महाराष्ट्र आता थांबणार नाही…! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालानुसार महाराष्ट्र सर्वच आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर; दिमाखदार वाटचालीसाठी नागरिकांचे अभिनंदन..

मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र आता थांबणार नाही…! महाराष्ट्र सर्वच महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. असा अहवाल जगातील गुंतवणूक बँकिंग तसेच वित्तीय संशोधन क्षेत्रातील ख्यातनाम वित्तीय संस्था असलेल्या मॉर्गन स्टॅनले यांनी प्रकाशित केला आहे. या अहवालात महाराष्ट्र अनेक क्षेत्राचे नेतृत्व करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अहवालाचे तसेच त्यातील निष्कर्षांचे स्वागत केले आहे. हा अहवाल, त्यातील हे निष्कर्ष म्हणजे आपल्या राज्याने विविध क्षेत्रांसाठी स्वीकारलेले धोरण आणि त्यानुसार सुरू असलेली सकारात्मक वाटचालीचे द्योतक आहे. यातून महाराष्ट्रावरचा विश्वास व्यक्त झाला आहे. त्यामुळे या अहवालाचे आणि या संस्थेचे मनापासून आभार. यात आर्थिक विकास, पायाभूत सुविधा सामाजिक न्याय, वित्तीय शिस्त, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यांसह विविध क्षेत्रांतील कामगिरीची दखल घेतली गेली आहे.

महाराष्ट्राने २०३० पर्यंत वन ट्रिलीयन डॉलर्स म्हणजेच एक लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याचा संकल्प केला आहे. या दिशेने आपली दमदार पाऊले पडत असल्याचे, हा अहवाल म्हणजे निदर्शक आहे. मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालातून महाराष्ट्राच्या दिमाखदार वाटचालीवरच प्रकाश टाकला गेला आहे. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील तमाम नागरिकांचे मनापासून अभिनंदन!!! असेही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे

0000

संबंधित पोस्ट

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी सहा जणांना जामीन मंजूर!न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; पुरोगाम्यांचा दबाव दूर करण्यासाठी पानसरे खटला कोल्हापूर जिल्ह्याबाहेर चालवा !

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार- मंत्री उदय सामंत

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू- मंत्री मंगल प्रभात लोढा…

राज्याच्या संरक्षण उत्पादन धोरणामुळे देशाचे खरे ‘डिफेन्स क्लस्टर’ हे महाराष्ट्र आणि पुण्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल, लघु शस्रास्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

स्मार्ट गव्हर्नन्स व आदिवासी सशक्तीकरण या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देण्यासाठीकृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरासाठी सामंजस्य करार महत्त्वाचा ठरणार- कोकण महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीकोंकण विभागीय आयुक्त कार्यालय व विजयभूमी विद्यापीठ यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरासाठी सामंजस्य करार

टेमघर प्रकल्पाचे मजबुतीकरण, गळती रोखण्याच्या कामांसाठी३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता..

vishwatmaklokswamivarta