vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

विजयी भव, दिव्या..!’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्वचषक बुध्दीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दिव्या देशमुखला शुभेच्छा!

विजयी भव, दिव्या..!’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्वचषक बुध्दीबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी दिव्या देशमुखला शुभेच्छा!

राज्य प्रतिनिधी

मुंबई, : महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील चमकदार विजयासह अंतिम फेरीत धडक देणाऱ्या मास्टर दिव्या देशमुख हिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देणारी नागपूरची दिव्या देशमुख पहिली भारतीय ठरली आहे. दिव्याने माजी विश्वविजेती चीनची मातब्बर खेळाडू टॅन झोनग्यी हिला पराभूत केले. यासह ती महिला ‘कॅंडिडेट्स’ स्पर्धेत पात्र ठरली आहे. या ऐतिहासिक दुहेरी कामगिरीसाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस शुभेच्छा संदेशात म्हणतात, “दिव्या देशमुख हिने केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. ती बुद्धिबळातील भारताची नवीन आशास्थान आहे. तिच्या जिद्दीला आणि बुद्धिमत्तेला सलाम. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! दिव्याचे यश हे देशातील प्रत्येक युवक-युवतीसाठी प्रेरणादायी आहे.”

विशेष म्हणजे, दिव्या देशमुखने गतवर्षी कनिष्ठ गटात महिला विश्वचषकावर नाव कोरले होते. ही घोडदौड कायम ठेवत तिने यंदा वरिष्ठ स्तर स्पर्धेत अव्वल कामगिरी करत आपली छाप उमटवली आहे.

00000

संबंधित पोस्ट

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट* महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा समावेश* -रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव यांची माहिती* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना पर्यटन सुविधांची माहिती देण्याचे आवाहन**महाबळेश्वर येथे आयोजित महापर्यटन उत्सव-२०२५ चा शानदार समारोप*

छत्रपती संभाजी महाराज स्मृतीस्थळ विकासाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा

उझबेकिस्तानच्या दौऱ्यात पंतप्रधानांची उझबेकिस्तानच्या अध्यक्षांशी औपचारिक चर्चा

अंमली पदार्थ तस्करीप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा- ‘अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा’वर लक्ष केंद्रित- स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय मिनी सरस २०२५आर्थिक सक्षमीकरणामुळे महिलांची प्रगती- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी 

vishwatmaklokswamivarta