vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हर घर तिरंगा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी किशन जावळे

हर घर तिरंगा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड, प्रतिनिधी : ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम लोक चळवळ बनली असून यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. यंदा देखील हर घर तिरंगा अभियान उत्साहाने राबवून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.

 हर घर तिरंगा अभियानंतर्गत पहिला टप्पा 8 ऑगस्टपर्यंत, दुसरा टप्पा 9 ते 12 ऑगस्ट आणि तिसरा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट या तीन टप्प्यात करावयाच्या कार्यवाही बाबत शासनाकडून सूचना आलेल्या आहेत. हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक घरावर तसेच शासकीय/निमशासकीय सहकारी/खासगी आस्थापना कार्यालयात, अमृत सरोवर, वारसा स्थळे या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवण्यात यावा. ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. वारसा स्थळांच्या ठिकाणी रोषणाई करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयामध्ये विविध विषयांवर स्पर्धा तसेच, रॅली, प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेची व्याप्ती वाढवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्याकामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घ्यावा- पालघर पालकमंत्री गणेश नाईक

vishwatmaklokswamivarta

मंत्रालयात पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमितपणे साफसफाई व नमुने तपासणी – सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती

राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर बैठकीत सविस्तर चर्चा  धर्मनिरपेक्षता व शहराच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा महत्त्वाचा : अरविंद चव्हाण 

vishwatmaklokswamivarta

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न..

vishwatmaklokswamivarta

 स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

vishwatmaklokswamivarta