vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी..

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्रात विमानतळाच्या आजुबाजुच्या परिसरात असणारे फार्म हाउस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमामध्ये लेझर लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर दि.८ नोव्हेंबर २०२५पर्यंतच्या कालावधीसाठी बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३ (१) व (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व फार्म हाऊस, मंगल कार्यालय, विवाह सोहळा, सामाजिक कार्यक्रम इ. च्या आयोजक, मालक यांनी लेझर लाईट्स, बीम लाईट्स याचा वापर करु नये. कारण अशा वापर केल्यामुळे पायलटच्या दृष्यात अडथळा निर्माण होऊन लॅंडीग व टेकऑफ करण्यापूर्वी लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ अन्वये व प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तो शिक्षेस पात्र राहील,असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

डोनगाव येथील नेत्र तपासणीत २६१ रूग्णांची तपासणी

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारतींना आता एकच नमुना नकाशा प्रशासकीय इमारती आता नमुना नकाशानुसार बांधणे बंधनकारक- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ७५ हजार विद्यार्थी एका सुरात गाणार गीत…

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत आहेत शासनाच्या योजना,धारणी तहसील कार्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन,शासन आपल्या दारी संकल्पना साकार; धुळघाटरोड येथे महसूल समाधान शिबिर

vishwatmaklokswamivarta

सेवा हक्क कायद्याचा व्यापक प्रचार करा – राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव