vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

     अमरावती, प्रतिनिधी गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना राज्य स्तरावर पुरस्कार देण्याचे पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जाहीर केले आहे. या गणेशोत्सव स्पर्धेत जिल्ह्यातील ग्रामीण आणि नागरी गणेशोत्सव मंडळानी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    या पुरस्काराकरीता सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, वादन, नृत्य, नाट्य, लोककला, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कला, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला, माहितीपट, चित्रपट स्पर्धाचे आयोजन, संस्कृतीचे जतन, पोशाख संस्कृती, खाद्यसंस्कृती, वाद्यसंस्कृती, संस्कृती संवर्धनासाठी अभिनव उपक्रम, पारंपारिक नाणी, शस्त्र, भांडी संग्रहाचे प्रदर्शन, साहित्यविषयक उपक्रम, लुप्त होणाऱ्या कलाविष्कारांचे संवर्धन, तसेच राज्यातील गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय, राज्य स्मारके, धार्मिक स्थळांविषयी जनजागृती. जतन व संवर्धन आदी बाबी विचारात घेतल्या जाणार आहे.

    सामाजिक उपक्रमात महिला सक्षमीकरण, पर्यावरण रक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा, ज्येष्ठ नागरीक, शैक्षणिक, आरोग्य, शैक्षणिक, कृषिविषयक उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाची जनजागृती, वंचित घटकांसाठी उपक्रम, तसेच कायमस्वरुपी सामाजिक उपक्रमात आरोग्य सेवा, ग्रंथालय, वृद्धाश्रम, गाव दत्तक घेणे, वंचित घटकांसाठी सामाजिक सेवा, तसेच पर्यावरणपुरक मूर्ती, थर्माकोल, प्लास्टीक विरहीत पर्यावरणपुरक सजावट, ध्वनीप्रदूषणरहित वातावरण, पारंपारिक देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधेत पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाहीत असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता आदी बाबी पाहण्यात येणार आहे.

   उपक्रमांची पूर्तता करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी विहित नमुन्यात अर्ज करावा लागणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर दि. 26 ऑगस्ट 2025 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

भविष्य वाचवायचे असेल तर पर्यावरण वाचविणे आवश्यक – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन-चंद्रपूर येथे ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’चे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

जिजा ने साले की शादी 21 किलो फुलो का हार तोहफे शादी समारोह मे दुल्हा दुल्हन को पहनाया- उत्तर प्रदेश के जिला प्रतापगढ़ गाँव बंसी पुरवाइसअनोखे उपहार की पुरे जीले में चर्चा..

वारणा धरणात 25.31 टी.एम.सी. पाणीसाठा

वृत्त विशेष- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धेत लातूर विभागातील चार बसस्थानकांची उत्कृष्ट कामगिरी

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर :राज्याच्या समुद्रकिनारी असलेल्या कांदळवनांचे सर्वेक्षण सुरू- वनमंत्री गणेश नाईक

जल जीवन मिशन या महत्वकांक्षी योजनचे कामकाज शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच*