vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट

राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट

 

मुंबई, दि. १७: राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यात तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

भारतीय हवामान खात्याकडून १७ ते २१ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अधिकच्या अतिवृष्टी इशाऱ्यामुळे भूस्खलनाच्या अनुषंगाने सर्व आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहे.

या दरम्यान समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून खेड शहरातील जगबुडी नदीचे पाणी खेड – दापोली रस्त्यावर आल्याने खेड शहरांतून दापोलीकडे जाणारी वाहतूक सुरक्षास्तव बंद करण्यात आली आहे आणि जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत २८,०७५ क्युसेक्स तसेच यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात ५४,४६६ क्युसेक इतका विसर्ग सूरू आहे.

प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

०००

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय “अस्मिता लीग” क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न! 🏃‍♀️🏅

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारे परंपरागत देशी खेळ, संस्कृती संवर्धनाचेही माध्यम – सभापती प्रा.राम शिंदे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभाची जल्लोषात सांगता

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे ९४ कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाजहितासाठी उद्योग क्षेत्राचे योगदान प्रेरणादायी

जम्मू काश्मीरच्या पहालगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाने श्रध्दांजली सभा आणि जोरदार तीव्र स्वरूपात निदर्शने केले

vishwatmaklokswamivarta

न्यायाच्या दारात उपोषण, प्रशासनाच्या दारात कुलूप!सहा दिवसांचा जीवघेणा लढा; जयश्री कटके अढळ…अधिकाऱ्यांची बेफिकिरी उघडी…

शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे    –विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी